Breaking News

1/breakingnews/recent

केवळ राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा - आशिष शेलार

No comments


मुंबई -

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राजकीय वातावरण पेटलं आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. पण केवळ राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. केवळ राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावीच लागेल. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल, तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात आहे, असं सांगितले जात होते. पण कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते? कुणाची चौकशी करत होते? असा सवालही त्यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राठोड यांच्या राजीनाम्याचं स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला आहे. पण त्यांनी ठाकरी बाणा आधीच दाखवला असता तर बरे झाले असते, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात 20 दिवस चालढकल का केली? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केले आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *