आलं खाण्याचे फायदे
मुंबई -
आपल्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थांमध्ये सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे आले. आल्यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. पण तुम्हाला माहीत आहे का आलं हे पदार्थामध्ये चव आणण्याव्यतिरिक्त आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठीही वरदान ठरतं. आपण आल्याचा वापर नेहमीच करतो पण त्याचे इतर गुणधर्म मात्र आपल्याला पूर्ण स्वरुपात माहीत नसतात. प्रत्येक हंगामात आल्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. मुख्यत्वे हिवाळ्यामध्ये तर याचा खूपच चांगला उपयोग होतो. आलं हा मुळातच कफनाशक आणि शरीराला उष्ण ठेवणारा पदार्थ आहे. आल्याबरोबर काही गोष्टींचं मिश्रण करून त्याचा वापर नियमित केल्यास, तुमचं आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. या लेखामध्ये तुम्हाला आम्ही आल्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यातही याचा उपयोग करून घेता येईल. पाहूया तर मग आल्याचे नक्की काय फायदे आहेत. नैसर्गिक पेनकिलर्स म्हणूनही तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.
1. सकाळचा थकवा दूर घालवतं
बऱ्याचदा अधिक कामामुळे नेहमी सकाळी उठताना थकवा जाणवतो. याला आपण नॉशिया येणं असंही म्हणतो. पण यावर सर्वोत्तम नैसर्सिक उपाय म्हणजे आलं. सकाळी उठल्यानंतर मळमळ होत असेल तर आलं त्यावर फायदेशीर ठरतं. त्यामुळेच बऱ्याचदा आल्याचा चहा केला जातो. तुम्हाला सकाळचा थकवा घालवण्यासाठी हा उपयुक्त ठरतो. तसंच गरोदर बायकांसाठीही आलं फायदेशीर असल्याचं अभ्यासातून सिद्ध झालं आहे. तसंचं ज्यांना कॅन्सर आहे अशा रूग्णांना केमिओथेरपी चालू असताना नॉशिया घालवण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. अशा वेळी त्यांना आल्याची वडी, आल्याचा चहा तुम्ही देऊ शकता.
2. फंगल इन्फेक्शनपासून ठेवतं दूर
बऱ्याच जणांना खाज अथवा यीस्ट इन्फेक्शन होत असतं. यावरही आलं हे गुणकारी आहे. जे अॅथलिट असतात त्यांच्या पायांना खाज येण्याचं प्रमाण जास्त असतं. यावर आलं हा सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये असणाऱ्या अँटिफंगल घटकांमुळे हा आजार लवकर बरा होतो. त्वचेवर फंगस इन्फेक्शन कमी करण्यासाठी असणारे सर्व गुणधर्म आल्यामध्ये आढळतात. एका अभ्यासात सिद्ध झालं आहे की, साधारण 29 अँटिफंगल मसाल्याच्या झाडांमधून आल्याच्या झाडात जास्त अँटिफंगल गुणधर्म असतात.
3. पोटाच्या अल्सरपासून करतं संरक्षण
बऱ्याच जणांना पोटाच्या समस्या असतात. मुख्यत्वे अपचनामुळे अल्सरसारखी समस्या काही लोकांना उद्भवतात. पोटाचा अल्सर हा अतिशय त्रासदायक आजार आहे. फटिग येणं, जळजळ होणं आणि सतत मळमळत राहणं ही याची लक्षणं आहेत. पण आल्याची पावडर यावर एक चांगला उपाय आहे. यामध्ये असणारे इन्फ्लेमेटरी प्रोटीन्स पोटाच्या अल्सरची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
4. पाळी नियमित येते
आल्याचा तुम्ही नियमित तुमच्या अन्नपदार्थांमध्ये वापर केल्यास, तुम्हाला पाळीचा त्रास सहसा होत नाही. आलं हे उष्ण असतं. तसंच पाळीच्या वेळी तुमच्या पोटातून येणाऱ्या कमी करण्यासाठीही आल्याच्या उपयोग होतो. यातील गुणधर्म पाळीच्या वेळी पोटातून येणाऱ्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पाळीच्या वेळी पोटामध्ये जास्त गॅस तयार होत असतो. आल्याच्या सेवनाने गॅस कमी होऊन पाळीचा त्रासही कमी होतो.
5. कॅन्सर रोखण्यास करतं मदत
आल्यामध्ये अँटिकॅन्सर घटक जास्त प्रमाणात आढळतात. यामध्ये असणारा 6 जिंजरोल हा महत्त्वाचा घटक कॅन्सर रोखण्यास मदत करतो. पण तुम्ही तुमच्या जेवणामध्ये असो अथवा इतर वेळेस आल्याचा नियमित खाण्यामध्ये उपयोग करायला हवा. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अन्यथा त्याचे उलट परिणाम होतात. गर्भाशय, प्रोस्टेट कॅन्सरच्या वाढीला थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो. कॅन्सरची वाढ होत असल्यास, आल्याच्या नियमित सेवनाने थांबते.

No comments
Post a Comment