शहराची खबरबात - अपघात प्रकरणी दोषींवर कारवाई करा - विश्वमानव अधिकार परिषद
News24सह्याद्री - अपघात प्रकरणी दोषींवर कारवाई करा - विश्वमानव अधिकार परिषद....पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. डेंटल कॉलेजच्या प्राध्यापकाला एकाने बेदम चोपले
पत्नीच्या बढतीच्या कारणावरून वडगाव गुप्ता येथील डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले डॉक्टर दिनेश विजय राजपूत यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीने प्राध्यापक राजपूत यांच्या कारची तोडफोड देखील केली आहेत
2. मोबाइलला चोर आरोपी मुद्देमालासह जेरबंद
मारुती गणपत चव्हाण हे घरासमोर झोपलेले असताना अज्ञात चोरटयांनी घरात घुसून मोबाइलला चोरल्याची घटना १७ फेब्रुवारी ला घडली होती सदर चोरीबाबत फिर्यादी यांनी कर्जत येथे गुन्हा दाखल केला सदरचा गुन्हा झाल्यानंतर श्री अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत सदर आरोपीचा शोध घेऊन आरोपींना विश्वासात घेऊन चोरीचा मोबाईल बाबत विचारपूस केली
3. 10 फेब्रुवारी चा अपघात प्रकरणी दोषींवर कारवाई करावी
10 फेब्रुवारी रोजी कंटेनरच्या धडकेत काहींचे अपघाती निधन झाले.या घटनेत असलेला कंटेनर नगर शहरामध्ये आलाच कसा असा सवाल विचारण्यात आलायया प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे विश्व मानव अधिकार परिषदेचे सय्यद बाबा यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे
4. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शहरात बैठक
महागाईने जनता त्रस्त असताना वृध्दापकाळाची काठी असलेल्या पेन्शन मध्ये सरकारने वाढ करण्याची गरज आहे हा प्रश्न गंभीर बनत असल्याने देशात आंदोलने उभी राहत आहेत मागणी करून प्रश्न सुटत नसल्याने आंदोलना शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
5. घरातील ज्येष्ठ महिला कुटुंबाचा कणा- शितल जगताप
रथसप्तमी निमित्त प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्यावतीने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या
No comments
Post a Comment