Breaking News

1/breakingnews/recent

दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या सेटवर चिमुकला चाहता; ज्योतिबासारखीच वेशभुषा पाहून सगळे भारावून गेले

No comments


मुंबई -

स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेची  लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.छोटे मुले सुद्धा प्रतिसाद देत आहे. थोरामोठ्यां सोबतच लहानग्यांना देखिल ही मालिका आवडते आहे. याचीच पोचपावती देणारा एक प्रसंग नुकताच घडला आहे. ज्योतिबांवर भरभरुन प्रेम करणारा एक चिमुकला चाहता नुकतंच सेटवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे ज्योतिबासारखीच वेशभुषा करत त्याने या सेटवर हजेरी लावली होती. 

या चिमुकल्या चाहत्याला भेटून सेटवर सगळेच जण भारावून गेले होते.  या छोट्या चाहत्याला भेटून ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचा आनंदही गगनात मावत नव्हता अश्या चाहत्यांमुळेच काम करायला नवी ऊर्जा मिळते. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका लहान मुलांनाही आवडते आहे याचा आनंद आहे. सेटवर पोहोचलेल्या या चिमुकल्याला तर मालिकेचं संपूर्ण शीर्षकगीत पाठ होतं आणि ते त्यांना आम्हा सर्वांसमोर सादर केले आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम असंच राहो अशी भावना विशालने व्यक्त केली.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *