Breaking News

1/breakingnews/recent

शिवजयंतीसाठी नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध

No comments


मुंबई -

ठाकरे सरकार कडून कोरोना संसर्गाचा विचार करता शिवजयंती कश्या पद्धतीत होईल पाहिजे ठाकरे सरकारने सांगितले आहे. १९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. कोरोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असले तरीही अद्याप काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

काय आहे नियमावली –

1.  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.

2.  यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.

3.  सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.

4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.

5.  महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.

6.  फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.

7. आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी

राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे लसीकरणाची तयारी सुरु असताना राज्यात बुधवारी २४ तासात ३४५१ नवे कोरोना रुग्ण सापडले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. राज्यात गेल्या २४ तासात ३४५१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर २४२१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९ लाख ६३ हजार ९४६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३५ हजार ६३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झाले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *