पोहरादेवी गडावर संजय राठोडांनी सत्य बोलावं, समाजाची दिशाभूल करु नये, कृत्याची कबुली द्यावी
मुंबई -
पूजा चव्हाण हे आत्महत्याप्रकरणानंतर १५ दिवसानंतर सर्वांसमोर दिसणारे संजय राठोड नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनाला जात आहे. संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. संजय राठोड येणार असल्यानेच पोहरादेवीत सकाळपासूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. संजय राठोड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीसाठी रवाना झाले आहे.
असून तिथे गेल्यानंतर ते बंजारा समाजाला उद्धेशून भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतके दिवस मौन बाळगणारे संजय राठोड आपली बाजू मांडताना नेमके काय बोलणार याची उत्सुकता सर्वाना आहे. पोहरादेवी गडावर संजय राठोड यांनी सत्य बोलावे, चुकीचे बोलून समाजाची दिशाभूल करू नये, त्यांनी त्यांच्या कृत्याची कबुली द्यायला हवी, पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांची प्रतिक्रिया, 7 ते 21 फेब्रुवारीपर्यंतची परळी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी, शांताबाई राठोड यांनी पोलिसांकडे केली मागणी संजय राठोड यांच्या ताफ्यात 16 वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहने, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे. संजय राठोड हे यवतमाळमधून आर्णीजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांची आणखी एक गाडी त्यांच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

No comments
Post a Comment