23 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - एसटीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थी हैराण....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
शहरात पोलिसांनी सोमवारी दिवसभरात विना मास्क फिरणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि फिजिकल डिस्टंसिंग पाळणाऱ्या 168 जणांविरोधात दंडात्मक कारवाई करून 22 हजार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे.
2. लॉकडाउनच्या धास्तीमुळे राहुरीत एकाची आत्महत्या
राहुरी रेल्वे स्टेशन परिसरातील तरुणाने घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विष्णू बाबासाहेब असे मृताचे नाव आहे. त्याने बचत गटाचे कर्ज काढले होते.
3. अतिक्रमण धारकांना नोटिसा
श्रीरामपूर बेलापूर मार्गे राहुरी फॅक्टरी रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. श्रीरामपूर ते बेलापूर रस्ता लवकरच चौपदरी होणार असून त्यासाठी विशेष दुरुस्ती निधीतून सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
4. नैतिकते वरच आदर्श गावाकडे वाटचाल.
पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरेबाजार गावातील आमूलाग्र बदल अनुभवले जलसंधारण कामाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा गावकऱ्यांनी बदलला आहे.
5. नगरच्या चिकूची देशभरातील ग्राहकांना भुरळ
श्रीरामपूर बाजार समिती ही चिकूच्या खरेदी विक्रीसाठी संपूर्ण जिल्ह्यात नावारूपाला आली आहे. येथे दररोज 25 ते 30 टन चिकूची सध्या आवक सुरू असून हरियाणा राजस्थान मध्यप्रदेशातील ग्राहकांना त्याची भुरळ पडली आहे. त्यामुळे दररोज सुमारे तीस लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
6. कर्मचार्यांचे पगार वेळेत करा
जानेवारी 2020 रोजी नव्याने कायम कंत्राटी पदावर कायम करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसल्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
7. एसटीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थी हैराण
तालुक्यातील पिंपळगाव माळवी डोंगरगण मार्गे नगर वांबोरी मार्गावरील एसटी बसच्या फेऱ्या कमी अनियमित असल्याने अहमदनगर येथील महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि पालक हैरान झाले आहेत.
8. नागवडे च्या मतदार यादीतील हरकतींवर गुरुवारी सुनावणी
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या 27 जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर 710 व्यक्तींनी 66 हरकती दाखल केल्या आहेत.
9. भरदिवसा चोरी मोहरीतील महिनाभरातील दुसरा प्रकार
जामखेड तालुक्यातील मोहरी येथे भरदिवसा घरफोडी होऊन एक लाख 56 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला येथील ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.
10. वाळूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
तालुक्यातील कोल्हार ते बेलापूर रस्त्यावर गळलिंब शिवारात प्रवरा नदी पात्रातून वाळूची वाहतूक करणारा टेम्पो लोणी पोलिसांनी पकडला. याप्रकरणी हवालदार सोमनाथ वडणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेजस राजू मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment