23 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - लॉकडाउनबद्दलचा मेसेज फॉरवर्ड करताना जरा जपून....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. बलात्काराच्या आरोपीला २२ वर्षांनी अटक
बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला २२ वर्षांनी महाराष्ट्रातून अटक आली आहे. या बलात्कारामुळे ओडिशा सरकार हादरलं होतं.
2. लॉकडाउनबद्दलचा मेसेज फॉरवर्ड करताना जरा जपून
लॉकडाउनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड करत असाल, तर खबरदार… कारण लॉकडाउनबद्दलच्या मेसेजमुळे तुम्हाला पोलिसी कारवाईला सामोर जावं लागू शकतं. हो, हे खरं असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे.
3. “महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक”
महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा थैमान घालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रसार वाढला असून, रुग्णसंख्येचा वेगही वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. दरम्यान, या संकटाबरोबर चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे.
4. चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला टोला
केंद्रीय अर्थमंत्रालयाने महाराष्ट्राला जीएसटीचे 11 हजार 519.31 कोटी दिले आहेत. त्यामुळे आता तरी महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम कोविडच्या उपाययोजना आणि राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी.
5. पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ
सलग 12 दिवसांच्या इंधन दरवाढी नंतर दोन दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढले नव्हते. मात्र दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत.
6. संजय राठोड सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनाला
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात येणार आहेत.
7. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अभाविपच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभाविपचे कार्यकर्ते सोमवारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
8. तुळजाभवानी मंदिरात कोरोना नियमांचं उल्लंघन
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून मुख्यमंत्री यांचा आदेश पायदळी तुडवला जात आहे.
9. पुण्यात संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या 1700 जणांवर कारवाई
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई केली जात आहे.
10. मालपाणी उद्योग समूहाच्या 34 कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी
गेल्या 70 वर्षांपासून तंबाखू व्यवसायातील मोठं नाव असलेल्या 'गाय छाप' तंबाखूच्या म्हणजेच मालपाणी समूहाच्या मुख्य कार्यालयासह तब्बल 34 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
No comments
Post a Comment