गंगूबाईचा रोल साठी आलिया ऐवजी भन्साळी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यासाठी इच्छुक
मुंबई -
गंगुबाई रिलीज आताच रिलीज झाला आहे गंगूबाई काठियावाडीच्या भूमिकेत आलिया भट्टला पाहण्यासाठी तिचे चाहते उत्साही झाले आहे. (24 फेब्रुवारी) ‘गंगूबाई काठियावाडी‘ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझर बघितल्यानंतर आलिया भट्टचे काैतुक केले जात आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटात गंगूबाई काठियावाडी’च्या भूमिकेत आलिया भट्ट ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यासाठी इच्छुक होते. संजय लीला भन्साळी यांना या चित्रपटात आलिया भट्टला कास्ट करण्याची इच्छा नव्हती.
संजय लीला भन्साळी यांना राणी मुखर्जी किंवा प्रियांका चोप्रा यांना आलियाऐवजी गंगूबाई काठियावाडीसाठी कास्ट करायचे होते. भन्साळी यांना वाटत होते की, प्रियांका किंवा राणी गंगूबाईची भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारू शकतात. यासाठी भन्साळी यांनी प्रियांकाशी चर्चा देखील केली होती. हाॅलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये प्रियांका व्यस्त असल्यामुळे तिने गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी नकार दिला होता. परंतू यावेळी प्रियांका भन्साळी यांना राणी मुखर्जीचे नाव सुचवले होते. एका मुलाखतीत प्रियंका म्हणाली की तिने या क्षणी कोणताही हिंदी चित्रपट साइन केलेला नाही किंवा संजय लीला भन्साळी यांच्याशी कोणत्याही चित्रपटाविषयी बोलले नाही.

No comments
Post a Comment