Breaking News

1/breakingnews/recent

‘दृश्यम 2’ हिट होताच दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिले सरप्राईज

No comments


मुंबई -

सध्या एक नवीन चित्रपट सोशल मिडियावर मोहनलालच्या ‘दृश्यम २’ची चांगलीच हवा चालू आहे. हा चित्रपट प्रेक्षक, समीक्षक सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. पहिल्या ‘दृश्यम’ची कथा पुढे नेणारी ‘दृश्यम २’ची कथा आहे. पण आता ही कथा पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच या दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी एक खास घोषणा केली आहे. दिग्दर्शकाच्या डोक्यात आता ‘दृश्यम’चे रहस्य सोडवण्याचा विचार चालू आहे. म्हणूनच जीतू यांनी घोषणा केली आहे की, लवकरच प्रेक्षकांना ‘दृश्यम ३’ही बघायला मिळणार आहे. हा तिसरा भाग चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कथा पुढे नेईल आणि हा तिसरा भाग या मालिकेतला शेवटचा भाग असेल. या तिसऱ्या भागात सगळी रहस्यं उलगडणार असल्याची माहिती जीतू यांनी दिली आहे. 

या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल बोलताना ते म्हणाले की, आत्ता लगेचच तर हा भाग प्रदर्शित होणार नाही कारण मला स्क्रिप्टमध्ये अजून काही बदल करायचचे आहे. केरळमधल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या तिसऱ्या भागाच्या कथेबद्दल अभिनेता मोहनलाल आणि निर्मात्यांबरोबर चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं. या चित्रपटाचा क्लायमॅक्स सुचला असून लवकरच यावर पुढचा विचार करण्यात येईल. मात्र अजून शूटिंगला सुरुवात झालेली नाही आणि कधी होईल याबद्दलही सांगता येणार नसल्याचंही ते म्हणाले. अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला रहस्यपट ‘दृश्यम २’ सध्या चांगलाच गाजतोय. याचाच पहिला भागही प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. पहिल्या भागाचा रिमेक हिंदीतही झाला होता ज्यात अजय देवगणने प्रमुख भूमिका साकारली होती. ‘दृश्यम २’ही आता हिंदीत येणार असल्याचं वृत्त आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *