Breaking News

1/breakingnews/recent

‘या’ शारीरिक समस्यांनी त्रस्त आहात? मग आहारात करा सीताफळाचा समावेश

No comments




मुंबई -

सुदृढ आणि निरोगी आरोग्य हवं असेल तर आहारात फळे आणि कडधान्यांचा आवर्जुन समावेश केला पाहिजे. अनेकदा डॉक्टरदेखील लहान मुलांना किंवा वयस्क व्यक्तींना फळे खाण्याचा सल्ला देतात. परंतु, अनेक जण फळं खाण्यास कंटाळा करतात. मात्र, फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असण्यासोबतच काही गुणकारी गुणधर्मदेखील असतात. त्यामुळे आज सीताफळ खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

सीताफळ खाण्याचे फायदे -

१. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होते.

२. रक्ताचे प्रमाण वाढते.

३. अशक्तपणा दूर होतो.

४. वजन वाढते.

५. हृदयासाठी फायदेशीर

६. छाती किंवा पोटात जळजळ होत असल्यास दूर होते.

७. उष्णतेचे विकार दूर होतात.

८. अपचन, अरुची दूर होते.

९. सीताफळाच्या बिया वाटून केसांना लावल्यास डोक्यातील उवा मरतात.

या काळात सीताफळ खाऊ नये

१. सर्दी-खोकला झाल्यास सीताफळ खाऊ नये.

२. जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढते.

३. सीताफळाच्या बियांची पूड केसांना लावतांना काळजी घ्यावी. डोळ्यात गेल्यास डोळ्याचे विकार होण्याची शक्यता असते.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *