Breaking News

6/breakingnews/random

महाअंतिम सोहळा भव्य होणार, धर्मेंद्र, रितेश आणि नोरा फत्तेही खास गेस्ट!

No comments


मुंबई -

बिग बॉसचा महाअंतिम सोहळा भव्य होणार आहे त्या साठी प्रमुख हजेरी कलाकार लावणार आहे. ‘बिग बॉस 14’ चा ग्रँड फिनाले आज रविवारी होणार आहे. हा फिनाले भव्य होणार असून यामध्ये धर्मेंद्र, रितेश देशमुख आणि नोरा फतेही दिसणार आहेत. फिनालेचा एक प्रोमोसमोर आला असून त्यामध्ये तिघांची झलक दाखवण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार माधुरी दिक्षीत बिग बॉस 14 च्या विजेत्याची घोषित करेल. चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत आहे म्हणजेच जरी बिग बॉस 14 च्या फिनाले आज आहे. मात्र, गुगलने बिग बॉस 14 च्या विजेत्याची घोषणा आधीच केली आहे.

 केवळ गुगलच नाही तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटते की  बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली होती. राखी सावंतने बिग बॉसच्या घरात उशीरा एन्ट्री केली आहे. मात्र राखी सावंत एन्ट्रीनंतरच बिग बॉस शोचा टीआरपी वाढला आहे. राखी शोमध्ये येण्याच्या अगोदर शोचा टीआरपी फक्त 1.1 असायचा पण तिच्या एंट्रीनंतर या शोची टीआरपी आता 1.9 च्या वर आहे. परंतु ट्रेंडनुसार रुबीनाचे वर्चस्व आहे. सलमान खानने आपल्या शनिवार व रविवारच्या वीकेंड वारमध्ये म्हटले होते की शो कोणीही जिंकू शकेल. रूबीनानंतर शोमध्येची प्रबळ दावेदार म्हणून राखी सावंतकडे बघितले जाते.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *