शहराची खबरबात - भुईकोट किल्ल्याची दुरावस्था पाहता छत्रपती संभाजी राजे नगरला येणार
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. भुईकोट किल्ल्याची दुरावस्था पाहता छत्रपती संभाजी राजे नगरला येणार
नगरचा इतिहास जपला पाहिजे. ऐतिहासीक वास्तूचे जतन झाले पाहिजे यासाठी जयंत येलूलकर हे कायमच दक्ष असतात.नगरमधील भूईकोट किल्ल्याची दुरावस्था झाली असून बुरूज केव्हाही कोसळेल, हे चित्र येलूलकर यांनीच जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
2. बालिकाश्रम रोड वरील चंदनाचे झाड चोरले
शहरातील बालिकाश्रम रोड वरील एस्सार पेट्रोल पंप येथून चोरट्याने चंदनाचे झाड चोरून नेले या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शंकर किसन डहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस नाईक कहानी हे पुढील तपास करत आहेत
3. अल्पवयीन मुलीची छेड एका विरुद्ध तोफखान्यात गुन्हा
आपल्या लहान भावाला शाळेत सोडून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे आकाश रंगनाथ लांडगे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
4. आरणगाव ते केडगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे कट्टर मौनसाधक अवतार मेहेरबाबा यांचे समाधी स्थळ असलेले आरणगाव येथील मेहेर बाबा येथे देशातून नव्हे तर परदेशातून देखील भाविक येत असतात आनंद गाव येथील या मेहेर बाबांकडे जाण्यासाठी केडगाव मधून जाणारा रस्ता भाविकांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे.
5. जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले नियम पाळा लॉकडाऊन टाळा
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकात मास्क न लावणे, गर्दी करणे अशी ढिलाई आढळून येत आहे. कोरोना पूर्णत: नष्ट झालेला नाही. व्हॅक्सीनेशन आले असले तरी गाफील राहणे उपयोगाचे नाही.
No comments
Post a Comment