7 वर्षानंतर श्रीशांतनं क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, विजय हजारे ट्रॉफीत एकट्याने निम्मा संघ माघारी धाडला
मुंबई -
7 वर्षानंतर श्रीशांतनं पुनरागमन केलं भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतनं विजय हजारे करंडक स्पर्धेतील सामन्यात 5 विकेट घेतल्या आहे. श्रीशांतची कामगिरी आणि केरळच्या फलंदाजांची बॅटिंगच्या जोरावर केरळने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला. श्रीशांतने 65 धावांच्या मोबदल्यात यूपीच्या संघाच्या 5 विकेट घेत केरळच्या विजयाचा पाया रचला. केरळने या स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. बीसीसीआयनं आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घातल्यानंतर तब्बल 7 वर्षानंतर श्रीशांतनं क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. तब्बल 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर श्रीशांत पाऊल ठेवले असून तो 2013 नंतर केरळसाठी खेळत आहे. 37 वर्षीय श्रीशांतने एका सामन्यात 5 विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे.
त्यानं 2006 मध्ये इंग्लंडविरोधातील सामन्यात 55 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट घेतल्या होत्या. यूपीच्या संघासाठी अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंना श्रीशांतनं बाद केले आहे. यूपीचा सलामीवीर अभिषेक गोस्वामी आणि मधल्या फळीतील फलंदाज अक्षदीप नाथ, भुवनेश्वर कुमार यांच्यासह दोन फलंदाजांना त्यानं बाद केले. श्रीशांतनं त्यांच्या गोलंदाजीवर 65 धावा देत 5 विकेट घेतल्या. उत्तर प्रदेशच्या संघाने केरळसमोर विजयासाठी 283 धावांचे आव्हान ठेवले होते. रॉबिन उत्थाप्पाच्या 85 धावा आणि सचिन बेबी याच्या 76 धावांच्या जोरावर केरळनं 3 विकेटने विजय मिळवला. केरळची सुरुवात निराशाजनक झाली होती मात्र, रॉबिन उत्थाप्पा आणि संजू सॅमसनच्या 104 धावांच्या भागिदारीनं केरळचा डाव सावरला. आपल्या कारकीर्दीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 169 विकेट घेतल्या असून एकदिवसीय सामन्यात 87 बळी तर कसोटी क्रिकेटमध्ये 75 बॅट्समनना त्याने आऊट केलंय. त्याची यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवड झाली होती.

No comments
Post a Comment