शहराची खबरबात - रेड सिग्नललाही नगरकर जुमानत नाहीत
News24सह्याद्री - रेड सिग्नललाही नगरकर जुमानत नाहीत....पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. रेड सिग्नललाही नगरकर जुमानत नाहीत
चौकात वाहतूक कर्मचारी उभा असो अथवा नसो बहुतांश बेशिस्त वाहन चालक सर्रास रेड सिग्नल जंपिंग करून वाहतूक नियमांचा भंग करत असल्याचे नगर शहरात दिसत आहे.
2. वंचित बहुजन आघाडी तर्फे बसस्थानकात स्वच्छता
संत गाडगे महाराज यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी व जय हिंद युवक मंडळ शीला विहार यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर येथील तारकपूर बस स्थानकावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या वेळी स्वच्छता करून संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले
3. रेल्वे स्टेशन परिसरात पाणीपुरवठा बंद
शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून या भागातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला
4. स्थायी सभापतींच्या निवडीला मुहूर्त
महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी काल सायंकाळी जाहीर केला असून सभापतीपदासाठी येत्या 4 मार्च रोजी मतदान होणार आहे
5. जिल्हा परिषदेमधील तांदूळ विक्रीचा तपास सुरु
जिल्हा परिषदेच्या आवारात तांदूळ विक्री केली जात असल्याचे प्रकरण उघड झाल्याने त्याची दखल घेत प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे विक्री करणारा कोण व कोणी जिल्हा परिषदेच्या आवारात तांदूळ विक्रीसाठी आणण्यास परवानगी दिली याचा तपास सुरू झालाय
No comments
Post a Comment