14 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - साखर कामगारांना 40% वेतनवाढ द्या...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. जिल्हा 56 गावातील पाणी दुषित
जिल्ह्यातील 14 तालुक्यातील पाण्याचे 1700 नमुने जानेवारीमध्ये तपासण्यात आले त्यात 56 गावातील 83 नमुने दूषित आढळून आले जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमुने तपासले जातात ज्या गावातील पाणी दूषित आढळले त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात
2. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा थकीत बिलामुळे बंद
महावितरण कंपनीने कृषी योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली मात्र कंपनीच्या योजनेत सहभाग घेण्याकडे त्यांचा कल दिसत नाही वीज बिल न भरल्याने महावितरणने अखेर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद केला
3. अग्निशमन दलाला उपाध्याय यांचे नाव
कोपरगाव शहरात विकासकामांचा डोंगर उभा करताना शहरवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अद्यावत अग्निशमन केंद्र उभारण्यास प्राधान्य दिले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचे नाव या केंद्राला दिले जात असल्याने आमच्यासाठी हा निश्चितच भाग्याचा क्षण आहे
4. प्रेयसीनेच मारले प्रियकराला
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारातील खून प्रकरणाचा अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी छडा लावत पाच आरोपींना अटक केलीये प्रियसीने सहकार्याच्या मदतीने प्रियकराचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
5. साखर कामगारांना 40% वेतनवाढ द्या
सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कामगारांना 40% वेतनवाढ देण्याची एकमुखी मागणी केली राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतन वाढी सह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने गठीत केलेल्या पक्षिय समितीची तिसरी बैठक समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली
6. प्रशासकीय इमारतींसाठी वेग
शहरात चार मजली भव्य प्रशासकीय इमारत तसेच पोलीस ठाणे कारागृह व पोलीस निवासस्थानाच्या स्वतंत्र इमारतीसाठी हालचालींना वेग आला आहे
7. ठेक्याची मुदत संपल्याने विद्यार्थी 'पोषण' ला मुकले
शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीच्या ठेक्याची मुदत डिसेंबर मध्ये संपली आहे त्यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाख विद्यार्थी शालेय पोषण आहारआला मुकले आहे
8. जंगली श्वापदांची तस्करी करणारी टोळी पोलीसांच्या ताब्यात
जंगली प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची व काही दुर्मिळ प्राण्यांची तस्करी करणारी मोठी टोळी पुणे वन विभागाने आज सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील खंदरमाळ शिवारात पाठलाग करीत पकडली. या कारवाईत संबंधित तस्करांकडून अत्यंत दुर्मिळ असलेले खवले मांजर व अस्सल वाघ नखे हस्तगत करण्यात आली आहेत.
9. मुख्यमंत्र्यांनी ठाकरी बान दाखवावा
अभिनेत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एखाद्या मंत्र्याकडे संशयाची सुई वळत असेल तर नि पक्ष तपासण्यासाठी त्याचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांप्रमाणे ठाकरे बाण दाखवावा अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना
10. १लाख १४ हजारांचे दागिने चोरले
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 14 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात हनुमंत कल्याण गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
No comments
Post a Comment