14 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - केरळमध्ये CAA लागू होणार नाही-मुख्यमंत्री पिनराई विजयन....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. केरळमध्ये CAA लागू होणार नाही-मुख्यमंत्री पिनराई विजयन
नागरिकत्व दुरुस्ती कायदा वरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशव्यापी कोरोना लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होईल, असे सांगितले होते.
2. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात विशेषाधिकार हनन नोटीस
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'डूम्सडे मॅन' म्हणत हेटाळणी केली. याप्रकरणी काँग्रेसचे लोकसभा सदस्य टी. एन. प्रतापन यांनी अर्थमंत्री सीतारमन यांच्याविरोधात विशेषाधिकार हनन नोटीस दिली आहे.
3. दिल्ली हिंसाचार प्रकरण - दीप सिद्धूला घेऊन पोलीस लाल किल्ल्यावर
दिल्ली हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेला आरोपी दीप सिद्धू आणि इक्बाल सिंह या दोघांना घेऊन शनिवारी दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लाल किल्ला गाठला.
4. पुण्याचे विधानभवन तीन महिन्यांत सुरू होणार
येत्या तीन महिन्यांत पुण्याचे विधान भवन सुरू करण्यात येणार असून, या विधान भवनाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील बळीराजांना होईल, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे तसेच बजेटबाबत महत्त्वाचे प्रस्ताव या अधिवेशनात सादर केले जातील.
5. औषध विक्रेत्यास 14 वर्षांनंतर 40 हजार रुपयांचा दंड
औषध विक्रेत्याने इंजेक्शन विक्रीत 21 पैसे जास्तीचे आकारल्या प्रकरणी न्यायालयाने तब्बल 14 वर्षानंतर 40 हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
6. पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट
गेली वर्षभर कोरोनाने सगळ्या जगाला हैरान केलं. कित्येक महिने तर कोरोनाच्या धास्तीने लॉकडाऊन केलं गेलं. काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात येतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली.
7. विनाअनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न सुटला
मागील वीस वर्षांपासून विनाअनुदानित शाळांवर कार्यरत असलेल्या तब्बल 17 हजार 199 शिक्षकांना 40 तर 1 हजार 70 शिक्षकांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.
8. वसई जवळच्या नायगाव खाडी रेल्वे पुलाला मोठ्या जहाजाची धडक
मुंबई व गुजरातला जोडणारा अतिशय महत्त्वाचा अशा एकमेव रेल्वे पुलाच्या खालून बेकायदेशीररित्या जहाजाची चोरी छुपे वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
9. शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर
प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना केला. त्यांच्या या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलंय.
10. करोना महाविद्यालये बंदचा "व्हॅलेन्टाईन डे'वर परिणाम
-प्रेम व्यक्त करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या 'व्हॅलेन्टाईन डे'ला वेगळेच वलय असते. विशेषत: तरूणाईकडून उत्साहात 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करण्यात येतो. यादिवशी गिफ्ट देण्यासाठी बाजारपेठा आठवडाभर आधीच सज्ज असतात.
No comments
Post a Comment