शहराची खबरबात - दिल्ली गेट ते नेप्ती नाका रस्त्यावर पाणी सोडणाऱ्यांवर होणार कारवाई
News24सह्याद्री - दिल्ली गेट ते नेप्ती नाका रस्त्यावर पाणी सोडणाऱ्यांवर होणार कारवाई....पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. इंधन दरवाढीविरोधात निदर्शने
घरगुती गॅस पेट्रोल व डिझेल आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सामाजिक जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली पेट्रोल-डिझेल वरील सर्व कर माफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आले
2. अग्निशमन यंत्रणा नसल्याने सुरक्षा वाऱ्यावर
सर्वसामान्यांसाठी ची लाल परी एसटी बसमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने तसेच प्रथमोपचार पेट्याच गायब असल्याने एसटीची सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस मध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत त्यात प्रवाशांना इजाही झालेली आहे.
3. मनपा पुन्हा सुरू करणार दोनकोविदा केअर सेंटर
नगर शहरात कोरणा रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे त्यामुळे महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी हाईपोक्लोराइडची फवारणी सुरू केली असून दोन कोविद केअर सेंटर ही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे कोरोना रुग्णांची संख्या मागील काही महिन्यात कमी झाली होती
4. सत्तेच्या सारीपाटात काँग्रेसची घुसमट
राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेत पटत नसल्याची चर्चा सुरू असतानाच जिल्हा परिषदेत देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे
5. दिल्ली गेट ते नेप्ती नाका रस्त्यावर पाणी सोडणाऱ्यांवर होणार कारवाई
शहरात विविध भागात रस्त्यांचे डांबरीकरनासह पॅचिंगची कामे मनपाच्या बांधकाम विभागाने हाती घेतलेली आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी रस्त्यावर पाणी सोडू नये असे आवाहन महानगरपालिकेने केले तर दिल्ली गेट ते नेप्ती नाका विभागात रस्त्यावर पाणी सोडल्याने नव्याने झालेल्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
No comments
Post a Comment