11 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - तलवार हातात घेऊन फोटो व्हायरल करणाऱ्यास अटक...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
1. किरकोळ कारणातून एकास मारहाण
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या रागातून तिघांनी मिळून एकास मारहाण करीत बोलेरो जीप ची काच फुटल्याची घटना वारी येथे घडली
2. तलवार हातात घेऊन फोटो व्हायरल करणाऱ्यास अटक
नेेवासा तालुक्यातील कुकाना येथून सोशल मीडियावर तलवारीसह फोटो व्हायरल करून दहशत पसरवणार्या राजेंद्र ज्ञानेश्वर साळुंखे या तरुणाला सह पोलीस इन्स्पेक्टर भारत दाते यांनी आपल्या पथकासह तातडीने कारवाई करत राहत्या घरातून तलवारीसह अटक केली.
3. बियाणे उत्पादकांवर कारवाईसाठी शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
टोमॅटो बियाणे प्रकरणी इंदूर येथील शेतकऱ्यांनी बियाणे उत्पादक कंपनी वर कारवाई संदर्भात होत असलेल्या दिरंगाईबद्दल अकोले कृषी विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला.
4. दुकानदाराला धमकी एकाविरुद्ध गुन्हा दाखल
शहरातील औषध दुकान चालण्यासाठी दरमहा दहा हजार रुपये हप्त्यापोटी द्यावेत असे म्हणत लोखंडी कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी सचिन संजय साळवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
5. कोपरगाव नगर परिषदेत बेमुदत कामबंद आंदोलन
कोपरगाव येथील नगर परिषदेचे पदाधिकारी, महिला नगरसेविकांचे पती व काही नगरसेवक यांचा सतत कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप होत असून, हे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. त्यामुळे नगर परिषद कार्यालयात भीतीचे वातावरण तयार झाले.
6. मुख्याध्यापकानी केला शिक्षिकेचा विनयभंग
शिर्डी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापक विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
7. सभापती कांगुणे यांनी सोडविला ग्रामीण रुग्णालयांचा पाणी प्रश्न
नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयातील हातपंप गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत होते त्यांची दखल घेत पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगणे यांनी हात पम्प दुरुस्त केल्याने ग्रामीण रुग्णालयाचा पाणीप्रश्न सुटला आहे.
8. अकोलेत सहा ठिकाणी सरपंच पदे रिक्त
सरपंचपदी विराजमान झाले तर काहींना आशा लावली तेथे सदस्यांनी ठेंगा दाखवला नाही सरपंचपदाचा मान इतरांना मिळाला.
9. गोकुळ नगरी पुलालगत चा रस्त्याचे वाजले तीन तेरा
गोकुळ नगरी पुन्हा शहरातील मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो या पुलालगत असलेल्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून जागोजागी पडलेले खड्डे व उडत असलेल्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे.
10. बिनविरोध सदस्य,सरपंच होवून पल्लवी गायकवाड यांनी रचला इतिहास
कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेलं अष्टविनायक पैकी एक सिद्धिविनायक गणपती मुळे राज्यात प्रसिद्ध असलेलं सिद्धटेक हे चार हजार मतदार असलेलं एक गाव. या गावात सिद्धटेक, देऊळवाडी,वडार वस्ती आणि बर्डी ही गावे सिद्धटेक बर्डी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे.
No comments
Post a Comment