Breaking News

1/breakingnews/recent

11 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

     News24सह्याद्री - राम मंदिरासाठी 1000 कोटी रुपये दान....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा





TOP HEADLINES


1. १२ तासांमध्ये तीन मोठे भूकंप
मागील १२ तासांमध्ये ऑस्ट्रेलियापासून ते हिंदकुश पर्वतांच्या प्रदेशामध्ये तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे या तीन धक्क्यांपैकी एक धक्का भारतातील मिझोरममध्येही बसला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय तसेच एएफपी या वृत्तसंस्थांनी दिलं आहे. 

2. सहा महिन्यांत घरगुती गॅसच्या किमतीत 100 रुपयांची वाढ
कोरोनाच्या संकटाची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच गृहिणींना मोठा धक्का बसला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी सुरू असताना गॅस दरात वाढ करण्यात आलीय. 

3. तपोवनातील बोगद्यात अडकलेल्यानां  काढण्यासाठी सैन्याच्या बचावकार्यात बदल
चमोली जिल्ह्यात एक भलामोठा हिमकडा कोसळ्यामुळं मोठं नुकसान झालं आहे.. नद्यांवर सुरु असणाऱ्या प्रकल्पांनाही याचा फटका बसला 

4. पेट्रोल डिझेलची दरवाढ कायम
 पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाताना दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवे विक्रम मोडत आहेत. आज देशात सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. 

5. ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले, सर्व जिल्ह्यांमध्ये देणार धडे
ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

6. सर्वसामान्यांना कांदा रडवणार
कांदा उत्पादकांना चांगले दिवस येणार आहेत. तर गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांचं बजेट चांगलंच कोलमडण्याची शक्यता आहे. 

7. अविनाश भोसले यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात
पुण्यातील बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर  ED ने छापा टाकला होता. कारवाईदरम्यान अविनाश भोसले यांच्या मुलगा अमित भोसले  यालाही रात्री ईडीने ताब्यात घेतले आहे.

8. राम मंदिरासाठी 1000 कोटी रुपये दान
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत रायने यांनी राम मंदिरासाठी सतत दान येत असल्याचं सांगितलं. दान आलेली एकूण रक्कम जवळपास एक हजार कोटी रुपये आहे. 1 लाख 50 हजार लोक धन संग्रह अभियानासाठी जोडले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

9. रिक्षा चालवत रोहित पवारांनी आरे कॉलनीची केली सैर
राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार  यांनी आज आरेच्या जंगलात रपेट मारली. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांची संवाद साधत रोहित पवारांनी आरे परिसरातील प्रश्नांचा आढावा घेतला. 

10. क्रिकेटपटू वासिम जाफर यांच्यावर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप
भारताचे माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी अलीकडेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी हे पाऊल उचलले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *