Breaking News

6/breakingnews/random

शहराची खबरबात - जप्त वाहनांचा लिलाव, ४० लाख जमा

No comments

       News24सह्याद्री - जप्त वाहनांचा लिलाव, ४० लाख जमा




TOP HEADLINES

1. विवेकानंद स्कूल चे अध्यक्ष गिरधारीलाल मध्यान यांचे निधन
बातमीपत्राच्या सुरवातीलाच एक दु:खद बातमी आहे अहमदनगर शहरातील नामांकित व्यक्तिमत्व असलेले
सिंधी समाजाचे व सेंट विवेकानंद स्कूल चे अध्यक्ष गिरधारीलाल मध्यान  यांचे आज दु:खद निधन झाले आहे.

2. तपोवन रस्त्याचे काम पुन्हा सुरु
सावेडीतील तपोवन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत आहे हे काम  सार्वजनिक बांधकाम विभागाने  मे महिन्यातच उरकले होते पण  पहिल्याच पावसात त्याची वाट लागली. 

3. कापड बाजारात चोरी
कापड बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरांनी रोख रक्कम चांदीचे दागिने मोबाईल असा सात हजार रुपयांचा ऐवज लांबविला या प्रकरणी वैशाली उमेश देठेकर  यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

4. बसस्थानकावरील हिरकणी कक्ष धूळखात
नगर शहरातील तीन बसस्थानका पैकी दोनच  ठिकाणी   हिरकणी कक्ष असून ते धूळ खात पडले आहेत अनेक महिलांना तर या कक्षाबाबत माहितीच नाही त्यामुळे बसस्थानकावरील हिरकणी कीक्षाचा उद्देश सफल होत नाही ते केवळ जागा अडवून बसले आहे.

5. जप्त वाहनांचा लिलाव, ४० लाख जमा
अवैध गौणखनिज वाहतूक करताना महसूल विभागाने जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावली होती ज्या  मालकांनी दंड भरला नाही त्यांच्या वाहनाचा तहसील कार्यालयात लिलाव करण्यात आला महसूल प्रशासनाने 28 वाहन बाबत उद्घोषणा केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *