आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्याने टेन्शन वाढवलं?, शाळा, कॉलेज, आठवडी बाजार कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद!
मुंबई -
राज्यात कोरोना संसर्ग अतिशय वेगाने होत आहे.पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहे. महाराष्ट्रात मंगळारी 6218 कोरोना रुग्ण आढळले आहे. तर 5869 जण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यातील बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. तर, दुसरीकडे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत. जालना जिल्ह्यात मगंळवारी 117 रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना समितीची महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आहे.
यावेळी जिल्ह्यातील आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, 31 मार्चपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी म्हंटलंय.कोरोना प्रतिबंधक कायद्याच्या अमंलबजावणीसाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जालना जिल्ह्यात मंगळवारी 117 रुग्ण आढळले. आरटीपीसीआरद्वारे 106 व्यक्तींचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 11 असे एकुण 117 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

No comments
Post a Comment