Breaking News

1/breakingnews/recent

नाशिक स्थायी समितीची निवडणूक रंगतदार, सदस्यांची नव्याने नियुक्ती, मनसे किंगमेकरच्या भूमिकेत

No comments


मुंबई -

हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार नाशिक येथे महापालिकेत स्थायी समितीच्या सर्वच 16 सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्थायी समितीची निवडणूक रंगतदार होणार असून मनसे किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहे. तौलनिक संख्याबळाच्या आधारे नाशिकच्या महापौरांनी स्थायी समितीचे सदस्य जाहीर केले. नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भाजपचे 8, शिवसेनेचे 5, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीचा 1, तर मनसेचा 1 सदस्य असेल.

 महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना होणार असल्यामुळे मनसे स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहेत. तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात तक्रार केली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली. यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या एकाने वाढली आहे. सत्ताधारी भाजपला हायकोर्टाच्या निर्णयाचा मोठा धक्का बसला आहे, तर शिवसेनेला एका जागेची लॉटरी लागली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *