11 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - एसटी स्टॅन्ड परिसरात उभ्या 6 शिवशाही बसला भीषण आग...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाळ विकण्याचा डाव फसला
वसई विरार मध्ये लहान मुलांना विकण्याची टोळी सक्रिय असून अडीज लाखात एका आठ महिन्यांच्या मुलीला विकण्याचा धक्कादायक प्रकार विरार मध्ये घडला आहे. याप्रकरणी बाळाची विक्री करणाऱ्या चार जणांच्या टोळीला विरार पोलिसांकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
2. सातारा: एसटी स्टॅन्ड परिसरात उभ्या 6 शिवशाही बसला भीषण आग
साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीत चार शिवशाही बस जळून खाक झाल्या आहेत. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमन दलाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. 3. अर्बन को-ऑप. बँकेच्या वतीने उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन
वित्तीय सेवेसमवेतच समाजाच्या सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या दि अकोला अर्बन को-ऑप. बँकेच्या वतीने महानगरात उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
4. राज्यस्तरीय पशुधन विकास मंडळ हलविण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध
पशुधन विकास मंडळ कार्यालय अकोल्यात सुरू करण्यासाठी तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री डॉ.दशरथ भांडे यांनी पुढाकार घेतला होता. ज्याप्रकारे हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले त्याचा माजी मंत्र्यांनी निषेध केला आहेय.
5. युनिक होम मिनिस्ट्री ट्रॉफी या पुरस्काराने अकोला पी.टी.सी.सन्मानि
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पथकानं राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेऊन त्यांची तपासणी केलीय.यात केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय दिल्ली येथील पथकानं काही महिन्यांपूर्वी राज्यभरातील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेतलाय.
6. 60 पैकी 40 ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
इंदापूर तालुक्यामध्ये नुकत्यात 60 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, आणि आज अखेर सर्व 60 च्या 60 निकाल लागला आहे . ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 40 ठिकाणी निर्विवाद वर्चस्व व 2 ठिकाणी संमिश्र असे यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहे.
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल अधिक सक्रिय दिसत आहेत. राज्यपाल आणि सरकार यांच्यातील संघर्ष सामान्य बाब असली तरी गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार संघर्ष चर्चेचा विषय ठरत आहे.
सुप्रीम कोर्टाचा दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा आदेश दिला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणीमुळे परीक्षा सोडवण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांना रायटर देण्यापासून रोखता येणार नाही,
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद सातत्यानं उफाळून येत असतात. विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नियुक्त्यांचा वाद सुरु असतानाच आणखी एक वादाचा प्रसंग पुढे आला आहे.
10. 'कोहलीला ड्रिम इलेव्हनचा कॅप्टन करा आणि रहाणेला टीम इंडियाचा'
बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराजयाचा सामना करावा लागला होता. पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व हे विराट कोहलीनेच केले होते. त्यानंतर विराट कोहली पितृत्व रजा घेत माघारी परतला होता.
No comments
Post a Comment