Breaking News

1/breakingnews/recent

‘या’ दिवशी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार करण जोहरचा ‘Liger’‘ साला क्रॉसब्रीड

No comments



मुंबई -

करण जोहरने येत्या काही दिवसात त्याचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या  या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे नाव ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ असे आहे. आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. नुकताच करण जोहरने ट्विटरद्वारे ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत केली आहे. 

‘Liger हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये विजय देवरकोंडा अनोख्या स्टाइलमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये विजय देवरकोंडा फायटरच्या रुपात दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *