6 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याने चर्चा....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. गृहिणीच्या घरातील कामाचं मूल्य पतीच्या कार्यालयीन कामापेक्षा कमी नाही - सुप्रीम कोर्ट
दिल्लीत एप्रिल 2014 मध्ये कारच्या धडकेत दुचाकीस्वार जोडप्याचा मृत्यू झाला होता. जस्टीस एन वी रामणा आणि सूर्य कांत यांच्या खंडपीठाने दाम्पत्याच्या नातेवाईकांना मिळणारी नुकसान भरपाई 11.20 लाखांवरुन थेट 33.20 लाखांवर नेली.
2. नीरव मोदीची बहिण आणि मेहुणा होणार माफीचे साक्षीदार
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे
मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टात या दोघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल झाला असून तो कोर्टाकडून मंजुरही करण्यात आला आहे.
3. मनसेचं पोलिसांना जाहीर आव्हान
वसईमध्ये पोलिसांनी कारवाई करताना मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांनी व्हिडीओ शेअर करत थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे.
4. आमदार दिलीप बनकरांच्या अडचणीत वाढ
5. मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण - आशिष शेलार
शिवसेनेने आत्मविश्वास गमावला, म्हणून त्यांना खमंग ढोकळा आठवला, अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी टीका केली आहे
6. महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता
पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थितीचा परिणाम आगामी ३ दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. हवामानात सातत्यानं होणाऱ्या या बदलांमुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन संबंधित प्रशासकिय यंत्रणांकडून करण्यात येत आहे.
चिमुरडीचं अपहरण करुन बलात्कार केल्याप्रकरणी तलासरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘स्निफर डॉग’च्या मदतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.7. महाराष्ट्र पोलिसांच्या ‘स्निफर डॉग’ची कमाल
8. एमपीएससीची ८ जानेवारी तर यूपीएससीची परीक्षा १५ फेब्रुवारीनंतर
8 ते 17 जानेवारीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 15 फेब्रुवारीनंतर होईल, अशी माहिती आहे.
ऑस्ट्रेलियाला संघ दुसर्या कसोटीतील पराभवाला मागे सारून तिसरी कसोटी कशी जिंकता येईल याकडे पाहावे लागणार आहे. तथापि, तिसर्या कसोटीसाठी संघ निवडणे ही दोन्ही संघांची सर्वात मोठी चिंतेची बाब असणार आहे
9. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले
पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 29 दिवसांनंतर आज बदल झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात 25 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे तर पेट्रोल 24 ते 26 पैशानी वाढलं आहे.
10. दोन्ही संघात होणार मोठे बदल
No comments
Post a Comment