Breaking News

1/breakingnews/recent

रोहित शर्माचे पुनरागमन, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

No comments


मुंबई -

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे 7-11 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये (SCG) खेळला जाणार आहे. हिटमॅन रोहित शर्माने संघात पुनरागमन केले आहे. तर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे. यानिमित्ताने सैनीचे कसोटी पदार्पण ठरणार आहे. उमेश यादवला दुसऱ्या कसोटीत गोलंदाजीदरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला या मालिकेला मुकावे लागले. त्याच्या जागेवर थंगारासू नटराजनला संघात समाविष्ट करण्यात आले. 

नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र अखेर नवदीप सैनीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर हिटमॅन रोहित शर्माचं टीम इंडियात पुनरागन झाले आहे. मयांक अग्रवालला विश्रांती देऊन रोहितला संघात स्थान देण्यात आले आहे. रोहितच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. यामुळे रोहित या तिसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करतो, याकडे टीम इंडियच्या समर्थकांचे लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये सिडनीत एकूण 12 कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाला 12 पैकी 1 सामना जिंकता आला आहे.

 तर ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच टीम इंडियाने हा एकमेव सामना 42 वर्षांपूर्वी जिंकला होता. हा सामना 12 जानेवारी 1978 रोजी खेळला गेला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला सिडनीवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेला या मैदानावर इतिहास घडवण्याची संधी आहे. खबरदारी म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. सिडनी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांनाच हा सामना स्टेडियममध्ये येऊन पाहता येणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडू सदस्य आणि प्रेक्षकांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *