5 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - रोहित पवार पहाटे चार वाजता नवी मुंबई APMC मार्केटमध्ये...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
महाराष्ट्रात अद्याप ह्याचा धोका नाही. परंतु खबरदारी म्हणून अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. तसेच बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2. रोहित पवार पहाटे चार वाजता नवी मुंबई APMC मार्केटमध्ये पोहोचले
"हे मार्केटच पहाटे चार वाजता उघडतं त्यामुळे येथे आलो. सहा वाजता भाजी मार्केट आणि नंतर इतर मार्केट सुरु होतात. हे मार्केट कसं चालतं, याच्यात काय अडचणी आहेत तसंच शेतकरी, व्यापारी, माथाडी कामागर यांच्याबाबतीत असणारे विषय समजून घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत," अशी माहिती रोहित पवार यांनी यावेळी दिली

3. शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर
पीएमसी घोटाळ्याशी नाव जोडलेला हा शिवसेनेचा नेता माजी खासदार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. मात्र, हा नेता कोण? हे सोमय्या यांनी स्पष्ट केलेलं नाही.

4. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ऑनलाईन होणार
महापौर, उपमहापौरांची निवड ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्यानं सत्ताधाऱ्याचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्या माध्यमातून ही निवडणूक घेतली जाणार आहे.

5. मिळकत कर आणि दंडाच्या रकमेतून पुणे महापालिका मालामाल
अनलॉकनंतर पुणे महापालिकेला मोठं उत्पन्न मिळालं आहे. पुणे महापालिकेला मिळकत करातून पहिल्यांदाच 1 हजार 300 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावातही पुणेकरांनी पहिल्यापासून पालिकेचा कर भरण्यास प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं.

6. मुंबई-गोवा हायवेचे निम्मे काम पूर्ण
मार्च २०२२ अखेर या महामार्गाचे संपूर्ण काम होणार असून यांनतर चाकरमान्यांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणारे

7. शिवसेनेची गुजराती मतदारांना साद
शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' अशी टॅगलाईन वापरली जात आहे.दरम्यान, येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे

8. डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर यांना अटक
डबेवाल्यांना सायकल ऐवजी दुचाकी घेऊन देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांना अटक करण्यात आली आहे. तळेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घाटकोपर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

9. बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्यात येणारी अडचणी लक्षात घेता हे अर्ज भरण्यास १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

10. भारतीय संघाला मोठा धक्का
भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे के एल राहुलला मालिकेतून वगळण्यात आलं आहे.नेट्समध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती.

No comments
Post a Comment