Breaking News

1/breakingnews/recent

भारतीय संघासाठी काहीशी चिंतेची बातमी, दुखापतीमुळे तिसरा खेळाडू मायदेशी परतणार

No comments


मुंबई -

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघासाठी काहीशी चिंतेची बातमी भारताचा धडाकेबाज फलंदाज के एल राहुल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे.  मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तो पुढील दोन्ही कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. उर्वरित सामन्यातून माघार घेतली असून तो लवकरच भारतात परतणार आहे. सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी ही बातमी भारतीय संघासाठी काहीशी चिंतेची ठरु शकते.

बीसीसीआयने आज सकाळी याबाबत माहिती दिली. "मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर शनिवारी सरावादरम्यान फलंदाजी करताना केएल राहुलच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. ही दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा अवधी लागेल. तो लवकरच ऑस्ट्रेलियाहून भारतात रवाना होईल. बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत," असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. सलामी, मधल्या फळीत फलंदाजीसह यष्टीरक्षक भूमिका बजावणाऱ्या के एल राहुलला आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु बदलत्या परिस्थितीमुळे तो संघासाठी उपयोगी ठरला असता.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *