Breaking News

1/breakingnews/recent

तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ, कुछ कुछ होता है मधील; परजान दस्तूरने बांधली लग्नगाठ

No comments




 मुंबई -

‘कुछ कुछ होता है’ मधले शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला आहे. बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा आवर्जून समावेश केला जातो. शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात एक भूमिका प्रचंड गाजली. ती भूमिका म्हणजे बालकलाकार परजान दस्तूर याची. ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ’ या डायलॉगमुळे तुफान लोकप्रिय झालेला हा चिमुकला आता मोठा झाला असून नुकतीच त्याने लग्नगाठ बांधली आहे. परजानने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेयसी डेलना श्रॉफ हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे.

 या लग्नसोहळ्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परजानने पारंपरिक पारसी रितीरिवाजासह डेलनासोबत लग्न केले आहे.२०२० मध्ये परजानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नव्या वर्षात लग्नगाठ बांधणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर परजान व डेलनाने लग्न केलं आहे.परजानने ‘कुछ कुछ होता हैं’ व्यतिरिक्त ‘मोहब्बतें’, ‘परजानियाँ’, ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिकंदर या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला होता.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *