Breaking News

1/breakingnews/recent

2 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24सह्याद्री - म्यूच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या नियमांमध्ये बदल....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. देशभरात २४ तासांत २२ हजार ९२६ जण कोरोनामुक्त

देशातील करोना संसर्ग अद्यापही अटोक्यात आलेला नाही. करोना रुग्ण संख्येसह करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. मागील २४ तासांत देशभरात १९ हजार ७८ नवे करोनाबाधित आढळले, तर २२ हजार ९२६ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, करोनामुळे २२४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख ५ हजार ७८८ वर पोहचली आहे.  

2भारत - यूके दरम्यानची विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु
भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या प्रसारामुळे ही सेवा 8 जानेवारीपर्यंत रोखली होती. 23 जानेवारीपर्यंत दर आठवड्याला मर्यादीत स्वरूपात सेवा देण्यात येईल. 23 जानेवारीपर्यंत केवळ दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद या ठिकाणांवरून उड्डाणे होतील असे नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काल जाहीर केले .

3दिल्ली-एनसीआर भागात पावसाच्या तुरळक सरी
 एकीकडे उत्तर भारतात थंडीचा कहर सुरू असताना दुसरीकडे आज सकाळी राजधानी दिल्ली आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याची माहिती मिळाली आहे. राजधानी दिल्लीतील पारा १.१ अंशांवर गेला आहे. आगामी दोन दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीत ०२ जानेवारी ते ०५ जानेवारी या कालावधीत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

4देशभरात आज ‘ड्राय रन’; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश
भारतात करोना वॅक्सीनची तयारी पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्याच्या तारखेची घोषणा होण्या अगोदर, सर्व आवश्यक तयारी झाले आहे का नाही? याची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून आजपासून देशातील प्रत्येक राज्यात करोना वॅक्सीनच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय रन’ घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशभरात हा ‘ड्राय रन’ ला सुरवात झाली आहे.  महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.

5. मुंबईत नवीन वर्षाच्या पार्टीत मैत्रिणीची हत्या; दोघांना अटक
मुंबईतील खार मध्ये नवीन वर्षाच्या पार्टीत दोघांनी आपल्याच मैत्रिणीची हत्या केल्याचा प्रकार घडलाय. जान्हवी कुकरेजा असे हत्या झालेल्या 19 वर्षीय तरुणीचे नाव आहे. खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत पार्टीमध्ये सहभागी झालेल्या श्री जोगधनकर आणि दिया पाडणकर यांना अटक केली आहे. ही घटना मुंबईतील खार येथील भगवती हाइट्समध्ये घडली आहे.
  
6. पक्षादेश झुगारुन मनसे कार्यकर्ते भाजप नेत्याच्या पार्टीला
नाशिकचे माजी आमदार आणि भाजपवासी नेते वसंत गिते यांच्या मिसळ पार्टीनंतर मनसेत गटबाजी विकोपाला गेली आहे. पक्षाचे आदेश झुगारुन पार्टीला हजर राहिलेल्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांनी दिला आहे. पक्षांतराच्या चाचपणीसाठी गिते यांच्या काल झालेल्या मिसळ पार्टीला मनसेचे अनेक नेते उपस्थित राहिले होते.  

7. प्रवीण राऊत यांची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त
पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. पीएमसी बँक घोटाळ्यात ४ हजार ३३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपींची धरपकड सुरू केली. पुढे या घोटाळ्याची व्याप्ती वाढत गेल्याने ईडीने या घोटाळ्याचा पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली

8.खासदार नवनीत राणा यांची राज्य सरकारवर टीका 
महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे सरकारमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता असून भाजपकडून सरकारला कोंडीत पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे. 'घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे. जबरदस्तीने सरकारमध्ये राहणं आणि विचार न पटणं अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे,' असं म्हणत नवनीत राणा यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

9. म्यूच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या नियमांमध्ये बदल 
म्यूच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे 
म्यूच्युअल फंडातील गुंतवणूक पारदर्शक आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी भांडवली बाजाराच्या नियंत्रकांकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता म्यूच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. तुम्हाला मिळणाऱ्या पैशांवर याचा थेट परिणामी होणार आहे. 
 
10. टोकियो ऑलिम्पिकची तयारी युद्धपातळीवर
करोनाच्या धोक्‍यामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. स्पर्धेचे काउंटडाऊनही सुरु झाले आहे. मात्र, खर्च वाढला असला, तरी आयोजकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यांनी नव्याने तयारीला सुरवात केली आहे. कामाला सुरवात केल्यावर आयोजकांनी पहिल्या टप्प्यात उदघाटन आणि समारोप सोहळ्यासाठी नव्या समितीची नियुक्ती केल्याचे जाहिर केले. आता या दोन्ही सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी या नव्या समितीवर असेल.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *