कोरोना लस निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार ; पहा , केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
नवी दिल्ली - वृत्तसंस्था -
नववर्षाच्या सुरूवातीलाच केंद्र सरकारने देशवासियांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. देशात हळूहळ कोरोना लसींना मान्यता दिली जात असताना ती निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचे उत्तर अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले आहे. देशभरात ड्राय रन सुरू असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.
प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केले जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की ,”फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

No comments
Post a Comment