Breaking News

1/breakingnews/recent

2 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - औरंगाबाद पाठोपाठ आता अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES


1. घरफोडी करून पावणेचार लाखांची चोरी
श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान मारुती शेलार यांचे कोपरे रस्त्यावरील राहते घर भरदिवसा फोडून पावणेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरला. भरदिवसा चोरी झाल्याAचे वास्तव समोर आल्याने एकच कल्लोळ झाला. याबाबत ज्योती मारुती शेलार यांनी पाथर्डी पोलिसांत फिर्याद दाखल केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक आर. डी. कायंदे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.

2. 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना संगमनेर मध्ये समोर आली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पीडित मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगा हा पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असून तो सध्या संगमनेरातील एका उपनगरांमध्ये राहत आहे. या मुलावर शेख याने अनैसर्गिक अत्याचार करत त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याच फिर्यादीत म्हटलय. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पुढील तपास करत आहेत

3. महसूल मंत्री थोरात यांनी हटवला स्वतःचाच बोर्ड
नेता म्हटलं की विविध प्रकारचे फोटो येतात त्यामध्ये कुठेतरी नेत्यांना आनंदही असतो पण या उलट चित्र बघायला मिळालं ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर दौऱ्यादरम्यान. संगमनेर दौऱ्यादरम्यान त्यांनी चक्क स्वतःचा फोटो असलेले नव-वर्षाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स उतरवायला लावले हौशी कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर थोरात यांनी गाडी थांबून उतरवले यावेळी त्यांनी प्रांताधिकारी तहसीलदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बोलावून फ्लेक्ससाठी नियमावली तयार करण्याच्या सूचना केल्या

4. जामखेडच्या विंचरणा नदीचे रुपडे पालटले
वेडा बाबळी वेगवेगळ्या वेली गटारीचे पाणी सर्वत्र दुर्गंधी अशा स्थितीत असलेल्या विंचरणा नदीचे रूपडे पालटवले जात आहे. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून नदी प्रसाराचे सुशोभीकरण सुरू असून त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून यासाठी निधी मिळवलाय. यामुळे शहराच्या वैभवात भर पडत आहे

5. नगरचे प्रथम माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचं निधन  
अहमदनगर शहराचे प्रथम माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. खांडरे हे स्व. गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. अहमदनगरचे विधिज्ञ अॅड. बाळासाहेब खांडरे यांचे ते बंधू होते.

6. नगराध्यक्षांना साई मंदिरात जाताना रोखले
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी जगभरातून साईभक्त मोठ्या प्रमाणात शिर्डीत येतात यावर्षी नगराध्यक्षांसह काही पदाधिकारी मंदिरात दर्शनासाठी जात असताना मुख्याधिकारी यांनी त्यांना अडवून दर्शनापासून रोखले त्यामुळे पदाधिकारी ग्रामस्थ व मुख्याधिकारी यांच्यात व झाले

7. औरंगाबाद पाठोपाठ आता नगरचे नाव बदलण्याची मागणी
युपी मधील शहरांची नावे बदलांची पद्धत आता महाराष्ट्र राज्यातही जोर धरू लागले आहे औरंगाबाद पाठोपाठ आता अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी समोर आलीअहमदनगर चे नाव अंबिकानगर करावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले

8. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर 'एमआयएम'नं उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न
चीनच्या नाकेबंदीचा एक भाग म्हणून मोबाइल अप्लिकेशनसह अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पूर्वीपासूनच बंदी घालण्यात आलेला चिनी मांजा अद्यापही खुलेआम पद्धतीने कसा विकला जातो, संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल एमआयएमने केला आहे. या धोकादायक मांजाची विक्री करणाऱ्या व्यापऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी एमआयएम पक्षाने केली आहे. पक्षाचे नगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी जिल्हाधिकऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

9. कोपरगाव-कोल्हार-अहमदनगर वाहतूक वळवण्यात येणार
अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगाव कोल्हार अहमदनगर या रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील प्रवरा नदीवरील पुलाच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे त्यामुळे 4 व 5 जानेवारी,  आठ व नऊ जानेवारी आणि 11 ते 13 जानेवारी या दिवशी अनुक्रमे 24 तासांसाठी ची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले

10. घाटघरचे आंदोलक पुन्हा आंदोलनाच्या तयारीत
घाटघर येथील उदंचन प्रकल्पासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे संपादित करण्यात आली त्यानंतर शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आले परंतु पुनर्वसन आतील प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्यामुळे आदिवासी शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा टोकाची भूमिका घेऊन प्रकल्प बंद पाडण्याचा निर्णय घेतला आणि प्रकल्प बंद पाडल्यानंतर होणाऱ्या नुकसानीस अधिकारी व पदाधिकारी जबाबदार राहतील असा इशारा घाटघर येथील प्रकल्पग्रस्तांनी दिला

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *