Breaking News

1/breakingnews/recent

3 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री - केंद्राकडून शिष्यवृत्तीचे ५७१ कोटी मिळणार....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. २६ जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर परेड
चर्चेकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे कारण ही चर्चा निष्फळ ठरली तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. आता तर शेतकऱ्यांनी उद्याची चर्चा निष्फळ ठरली तर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढू असंही म्हटलं आहे 

2. दिल्लीत हाडं गोठणारी थंडीसोबतच पावसाचीही हजेरी  
पालममध्ये 0.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर रिझ, आयानगर आणि लोधी रोड येथेही पावसाच्या सरी बरसल्या.”  त्याशिवाय, हवामान विभागाने येत्या 2-3 दिवसांपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

3. 'कोवॅक्सिन' लस चाचणीचा अंतिम टप्पा आज नागपुरात 
 एवढेच नाही तर "हॉल विरीयॉन इनऍक्टीवेटेड वॅक्सीन" असलेली कोवॅक्सीन कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर ही तेवढीच परिणामकारक ठरेल असा ही चाचणी करणाऱ्या डॉक्टर्सचा दावा आहे.  

4. नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव द्या - मनसे  
विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आता मनसेने यात उडी घेत रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि बा पाटलांचे नाव द्या अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.  

5. शिवसेना ईडी विरोधात आक्रमक
 शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ED कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

6. मुंबई महापालिकेचा थकबाकीदारांना मोठा दणका
 मुंबई महापालिकेने या मालमत्तांचा लिलाव करून मालमत्ता कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार असून यासाठी स्थायी समितीची मंजुरी मागितली जाणार आहे.  

7. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापू्र्वी जुलै 2020 मध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली होती. तर जानेवारी 2020 मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी 2021 मध्ये देय असलेली 4 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण वाढ 11 टक्के होणार आहे. 

8. उठसूठ केंद्राकडे बोट दाखवणं बंद करा – दरेकर
 त्यामुळे राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केलं पाहिजे. अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.  

9. केंद्राकडून शिष्यवृत्तीचे ५७१ कोटी मिळणार 
केंद्राच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या सचिवांनी नुकतेच राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला याबाबत कळविले आहे.  

10. अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर  
तर सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली. त्या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. सौरव गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वुडलँड या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *