Breaking News

1/breakingnews/recent

घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?: नितेश राणेंचे शिवसेनेवर टीकास्त्र

No comments




मुंबई -

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर ईडीविरोधात सेना रस्त्यावर उतरणार असल्याचे वृत्त आहे. लागोपाठ आलेल्या ईडीच्या नोटीसांमुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या मोर्चावरून भाजपाचे आमदार नितेश राऊत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ५ जानेवारी रोजी त्यांची चौकशी होणार असून, यावेळी शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे वृत्त आहे. मुंबईसह जवळच्या शहर परिसरातून शिवसैनिक येणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या या शक्तीप्रदर्शनावरून आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही  हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही  पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म? असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *