Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - पोलिओ निर्मूलनासाठी १७ जानेवारीला लसीकरण

No comments

            News24सह्याद्री पोलिओ निर्मूलनासाठी १७ जानेवारीला लसीकरण...पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES

1. बाळ बोठेला फरार घोषित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा महिनाभरापासून पसार असून प्रयत्न करूनही पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. एकूणच ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.
-----
2. पोलिओ निर्मूलनासाठी 17 जानेवारीला लसीकरण
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 17 जानेवारीला राबवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. 18 जानेवारीला तांत्रिक खंड घेऊन ग्रामीण भागात व 19 जानेवारीपासून तीन दिवस व शहरी भागात सलग पाच दिवस घरोघरी जाऊन राहिलेल्या लाभार्थ्यांना शोधून पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. पोलिओ पासून कोणी वंचित राहू नये, यासाठी 101 ट्रान्सलेट टीम द्वारे बस, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी आणि 131 मोबाईल टीमद्वारे ऊस तोड कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्या लोकांची मुले यांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे
-------

3. पालिका आयुक्तपदी नवीन नावांची चर्चा
महापालिका आयुक्तपदासाठी अजय चारठणकर, महेश डोईफोडे आणि स्मिता झगडे यांच्या नावाची चर्चा आहे. अजय चारठणकर यांनी आयुक्त म्हणून आणण्यासाठी आमदार संग्राम जगताप आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे. गुरुवारी महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार  हे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्त असून सध्या या पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला नवीन आयुक्त मिळवण्यासाठी शहराचे आमदार जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते

------
4. बेकायदेशीर रजेची नुकसान भरपाई द्या
नागपूर औद्योगिक वसाहतीतील क्लासिक व्हील युनिट एकमधील कामगारांना वारंवार बिगारी रजा दिली जात आहे. त्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून कामगारांना बिगर पगारी रजेची नुकसान भरपाई मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र इंजीनियरिंग उद्योग कामगार संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
--------
5. पशुपालनासाठी खेळते भांडवल योजना
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील 45 हजार शेतकऱ्यांना पशुपालनासाठी 268 कोटी रुपयांचे खेळते भांडवल वाटप केले आहे. एका खातेदारास पंधरा हजार ते दीड लाखापर्यंत हे भांडवल दिले जाते. मात्र यंदा पहिल्यांदाच ही योजना राबवली जात असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *