5 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - पाचेगावात बिबट्याचे हल्ले सुरूच....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. पतंग उत्सवात नायलॉन धागा वापरण्यास व बाळगण्यास बंदी
पतंगबाजीसाठी नायलॉन धागा वापरणारे किंवा बाळगणाऱ्यांवर यापुढे कारवाई होणार असून लहान मुलांकडे नायलॉन धागा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई होणार आहे.
2. राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायत पैकी 6 बिनविरोध
राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायत निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या, यात 25 पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना यश आले आहे , यामध्ये लोणी बुद्रुक, कोल्हार बुद्रुक, भगवतीपुर, पिप्री लोकई, तिसगाव व सावळी विहीर खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे,
बाईट - नायब तहसिलदार B.G. भांगरे
3. कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायती 7 उमेदवार बिनविरोध
कोपरगांव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज माघारी प्रक्रीयेत उमेदवारी दाखल एकुण ९७५ अर्जा पैकी ११ अर्ज अवैध झाले असून एकूण शिल्लक ९६४ अर्जापैकी ६११ अंतिम उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
4. पाचेगावात बिबट्याचे हल्ले सुरूच
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे बिबट्याचे पशुधनावर हल्ले सुरूच आहेत बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे
5. विविध मागण्यांसाठी कर्जत नागरपंचायत समोर धरणे आंदोलन
बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोमवारी कर्जत नगरपंचायतसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था व्हावी, राजीव गांधी नगर येथील सर्व भागांची स्वच्छता करण्यात यावी, रमाई आवास योजना तात्काळ चालू करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
6. जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका गहू व कांद्याच्या पिकाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
7. जामखेड तालुक्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध
जामखेड तालुक्यातील दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर काही ग्रामपंचायतींमधील काही प्रभाग बिनविरोध झाले आहेत. एकुण 417 जागांपैकी 117 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर 300 जागांसाठी 714 उमेदवार रिंगणात आहेत.
8. शेवगाव तालुक्यात शेवटच्या दिवशी ४४० उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे
अर्ज माघारीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती . त्यातच दुपारी पाऊस सुरू झाल्याने प्रशासनासह उमेदवारांची धांदल उडाली . त्यानंतर चिन्ह वाटपही झाले.
9. मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक
राहता येथे व्यापाऱ्यांच्या दुकानातून मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथून अटक केली. मोईन मोहम्मद पठाण व बंटी अमरसिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत याबाबत राहता पोलीस ठाण्यात सागर निवृत्ती लुटे यांनी फिर्याद दाखल केली होती
No comments
Post a Comment