Breaking News

1/breakingnews/recent

4 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

   News24सह्याद्री - राज्यात महिलांवर अत्याचार वाढले - स्नेहलता कोल्हे...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी




TOP HEADLINES


1. क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती मोठ्या उत्सहात साजरी
 क्रांती ज्योती सवित्री बाई व जेष्ठ स्वतंत्र सेनानी गुरुवर्य बा.ह नाईकवाडी यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले यावेळी उपमुख्याध्यापक सुरेश आंबरे ,पर्यवेक्षक सुजल गात  यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई  फुले यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले

2. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती  निमितान एकपात्री अभिनय नाट्य  
 लहान वयातच अभिनय, वाचन गुरुजनांचे मार्गदर्शन तसेच आई वडील दोघे शिक्षक असल्यामुळे तिच्या या कलागुणांना वाव मिळत गेला आणि तिने सावित्रीबाई फुले यांची वेशभुशा करत सादर केलेल्या नाट्याने सर्वांची मने जिंकली .

3. वऱ्हाडींना रबडीतून विषबाधा
दुधाची रबडी खाल्ल्यामुळे तब्बल शंभरावर वऱ्हाडी ना उलट्या पोटदुखी मळमळ सुरू झाली सर्वांना तात्काळ राहुरी फॅक्टरी कोल्हार येथे उपचाराकरिता दाखल केले तर चार अत्यवस्थ रुग्णांना लोणी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले

4. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणातून समाज परिवर्तनाचा पाया घातला - बाळासाहेब थोरात
 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते

5. फुले दांपत्याच्या कार्याचा आदर्श घ्यावा
 नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी राहाता नगरपालिकेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना व्यक्त केले यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा तसेच राहता नगरपालिकेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते

6. ठाकूर निमगाव येथे भरदिवसा घरफोडी
घरातील व्यक्ती बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भर दुपारी घराचा दरवाजा तोडून धाडसी चोरी केले, सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला शासकीय ठेकेदार रामकिसन भगत यांच्या घरी चोरी झाली याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

7. राज्यात महिलांवर अत्याचार वाढले - स्नेहलता कोल्हे
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली पेण येथील आदिवासी समाजातील अडीच वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली त्या घटनेचा जाहीर निषेध करीत त्यांनी भावना व्यक्त केल्या

8. नगर जिल्ह्यात सी प्लेन सेवा होणार सुरु
 महाराष्ट्रात मुंबई ते शिर्डी सह लोणावळा आणि गणपतीपुळे यासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर ही सेवा सुरू केली जाणार आहे. हि सेवा सुरु झाल्यास शिर्डी येथे येणाऱ्या साई भक्तांना ह्या प्रवासाचा वेगळा आनंद मिळणार आहे.

9. बंदी असलेला मांजा विकणाऱ्या दोघांवर संगमनेर पोलिसांची कारवाई
 मकरसंक्रांतीला कोणत्याही स्थितीत बंदी असलेला मांज्या वापरू देणार नसल्याचा निश्चय केला त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी छापेमारी करून सुमारे 26 हजार रुपयांचा बंदी असलेला मांजा जप्त करून एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला

10. सोनईत पुन्हा पेटला गडाख विरुद्ध गडाख संघर्ष
 खासदार तुकाराम गडाख यांच्या ताब्यात होती त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीत त्यांचेच बहुमत असायचे मात्र त्यांची एक संस्था अडचणीत आल्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त होते मात्र आता सोनई ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे डफडे वाजल्यानंतर ते आणि त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *