शहराची खबरबात - बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंट अर्जावर आज सुनावणी
News24सह्याद्री - बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंट अर्जावर आज सुनावणी....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंट अर्जावर आज सुनावणी
शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने त्याच्या विरोधात इतर मार्गाने फासा आवळण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर तरतुदींचा आधार घेतला आहे. त्यामुळे या अर्जावर काय सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
2. ग्रामसेवक विकासाचा दूत - राजेंद्र क्षीरसागर
नगर जिल्ह्यात शासकीय योजनांची अतिशय प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामसेवकांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले
3. 1 लाख देऊनही नगरसेवकांची बोळवण
नगरसेवकांनी एकत्रित स्वेच्छा निधी देण्याची ही पहिलीच घटना आहे. मात्र विद्युत विभागाकडून नगरसेवकांची बोळवण सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे .
4. सावित्रीच्या लेकींचा सन्मान
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नगर मधील विविध संघटनांच्या वतीने शैक्षणिक वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
5. तीर्थक्षेत्रांसह पर्यटनासाठी एसटीचे 'पॅकेज टूर'
जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी ही योजना जाहीर केली आहे. या पॅकेज टूर मध्ये एसटी प्रशासनाने फक्त एसटीच्या तिकिटाचे दर आकारले असून मुक्काम व जेवणाचा खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे
No comments
Post a Comment