Breaking News

1/breakingnews/recent

4 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

    News24सह्याद्री -  मुंबईत दिवसाला 10 हजार जणांचे लसीकरण होणार....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. सचिन पायलट यांची आरएसएस आणि भाजपावर सडकून टीका
राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपावर टीका केली. जयपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.  

2. मुंबईत दिवसाला 10 हजार जणांचे लसीकरण होणार
लसीकरणासाठी मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आणि जम्बो कोव्हिड सेंटर्समध्ये तयारी करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. दर दिवसाला मुंबईत 10 हजार जणांचे लसीकरण केले जाणार आहे.

3. महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे - शिवसेना 
चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरूच केली आहे असा टोला लगावताना महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.  

4. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन
एक महिन्यापासून साताऱ्यातील डायलिसिस सेंटरमध्ये उपचार घेत होते. आज पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.  

5. तिवरे धरण पुन्हा बांधलं जाणार
2 जुलै 2019 रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती. हे धरण नेमकं कशामुळे फुटलं? याचं उत्तर अद्यापही मिळू शकलेलं नाही. पण आता हे धरण नव्यानं बांधलं जाणार आहे. भूगर्भतज्ज्ञांकडून या धरणाची पाहणीही करण्यात आली आहे.  

6. मल्लिकार्जुन रेड्डी यांचं कृषी कायद्यांवर पुस्तक
भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी कृषी कायद्यांची माहिती देणारं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं नाव ‘कृषी विधेयक 2020’ असून त्याचे प्रकाशन केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.  

7. मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या 
मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 6 ते 7 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता आहे

8. मुलांकडे नायलॉनचा मांजा सापडला तर पोलीस पालकांवर गुन्हा दाखल करणार
 कोणत्याही लहान मुलाकडे नायलॉनचा मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करत गुन्हा दाखल होईल. पोलिसांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

9. खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ
आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्यानं खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचं या महिन्याच बजेट कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  

10. सिडनी टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 7 जानेवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ आज मेलबर्नहून सिडनीला रवाना होणार आहेत. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *