Breaking News

1/breakingnews/recent

3 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

  News24सह्याद्री - मंदिराचा कळस चोरणारे चोरटे जेरबंद...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी




TOP HEADLINES

1. खासदार सुजय विखेंनी दिला संचालक मंडळासह राजीनामा देण्याचा इशारा  
 डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावर अधिकारी व कर्मचारी यांची बैठक पार पडली प्रसंगी डॉ.विखे बोलत होते.

2. भाविकांच्या जिभेवर पुन्हा आमटीची चव रेंगाळणार
आमटी भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अशा अस्सल गावरान मेनुची चव पुन्हा भाविकांच्या जिभेवर रेंगाळणार आहे.  याबाबतच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करूनच देवस्थानने हा निर्णय घेतलाय

3. कर्जत मध्ये आ. रोहित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण
 नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छते बरोबरच श्रमदानाने करण्यात आली. यावेळी आ रोहित पवार यांनीही सर्व श्रमप्रेमी बरोबर सहभागी होत श्रमदान करत वृक्षारोपण केले.    

4. कोपरगावात पर्यावरणाच्या पंचतत्वानुसार होणार संवर्धन
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानुसार पृथ्वी वायू जल अग्नी आकाश या पंचतत्त्वांच्या आधारित शहरात हे अभियान राबवले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे

5. मंदिराचा कळस चोरणारे चोरटे जेरबंद
हनुमान मंदिराचा कळस व घंटा चोरणारे सराईत चोरटे जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले हनुमान मंदिराचा सात हजार रुपये किमतीचा पितळी कळस व तीन हजार रुपये किमतीची पितळी घंटा असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता

6. माझी वसुंधरा अभियानांतर्गत राहत्यात वृक्षारोपण
राहता नगरपालिकेत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले यावेळी नगराध्यक्ष ममता पिपाडा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या अभियानाच्या हरित शपथेचे वाचन करण्यात आले

7. अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी
 पाच जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शेख याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार करीत त्याला शिवीगाळ व मारहाण केली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला*

8. तलावातील पाणी वाटपाचे खाजगीकरण करणार
विसापुर तलाव व कुकडी कालव्याचे पाणी वाटपाचे तीन वर्षांसाठी टेंडर काढले जाणार आहे. तसेच लाभक्षेत्रातील सर्व सहकारी पाणी वापर संस्था टेंडर घेणाऱ्या एजन्सीला जोडल्या जाणार आहेत*

9. दादा पाटील महाविद्यालयात भव्य सभागृह उभारणार  - आ. रोहित पवार
हेतूनेच दादा पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य असे सभागृह उभारणार असल्याचे प्रतिपादनआमदार रोहित पवार यांनी केले. दादा पाटील महाविद्यालयात शारदाबाई पवार सभागृह भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.*

10. राज्यावरील संकट हेतू दे , मिलिंद नार्वेकरांचे शनिदेवाला साकडे
राज्यावर आलेले करणाचे संकट लवकर हटू दे अशी प्रार्थना करीत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शनिदेवाची पूजा केली यावेळी शनिश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी नार्वेकर यांचा सत्कार केला  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *