24 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - माजी नगराध्यक्ष बोरुडे यांच्या मुलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. शेतकऱ्यांचा नेता हरपला
कोरोनाच्या काळातही त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता पारनेर तालुक्यात झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. आज उशिरा पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने शेतकरी नेता हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
2. शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्याची मागणी
शहरातील सर्व एसटी बसेस टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या.मात्र ग्रामीण भागात अद्याप एसटी बसच्या सेवा बंद असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. खास करून शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थीनींना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
3. शेतकऱ्यांचा रास्ता रोको
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी पाटील यांनी हस्तक्षेप करत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंकुश ढवळे विजय पाखरे सचिव अविनाश मस्के व शेतकरी यांच्यात चर्चा घडवून आणली बाजार समितीच्या कांदा लिलाव आज पुन्हा सुरू करत दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ करून उपस्थित शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला
4. सय्यद खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
पाथर्डी येथील आयुब उस्मान सय्यद यांच्या खून प्रकरणी आरोपी समद सालार सय्यद याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंड तसेच दुसरा आरोपी शकूर सालार सय्यद याला सहा महिने सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे
5. माजी नगराध्यक्ष बोरुडे यांच्या मुलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
माजी नगराध्यक्ष भागचंद घोडके यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक रामराव डिके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव हे करीत आहेत
6. दरोड्याच्या तयारीतील तीन जणांना पकडले
एकावर लोणी व राहता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत त्यांची झडती घेतली असता एक सुरा मिरचीपूड नायलॉन दोरी लाकडी दांडके असे दरोड्याचे साहित्य काळ्या रंगाची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
7. वादग्रत रस्त्याचा प्रश्न्न सोडविला-प्रशांत गडाख
गुप्ताई माता मंदिराचा रस्ता पाच वर्षांपासून वादात अडकला होता खडीकरण मंजूर होऊन मागील महिन्यात काम सुरू झाले मात्र सिमेंटच्या नळ्या टाकण्यावरून पुन्हा वाद झाल्याने काम बंद पडले होते त्यांनी बंद पडलेल्या कामावर जाऊन दोन्ही गटांची समजूत घालत वाद मिटवला गावाच्या प्रगतीसाठी ग्रामस्थांनी संघटित व्हावे असेही प्रशांत गडाख यावेळी म्हणाले
8. एसटी बस सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा
भारती संघटनेने केली आहे याबाबत स्थानिक व्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आला आलाय यापूर्वीही याबाबत आगर प्रमुखांशी चर्चा केली होती बुधवारपर्यंत एसटी बस सेवा पुर्वव्रत सुरु न झाल्यास गुरुवारी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे
9. विसापूर, घोडचे उद्यापासून आवर्तन
घोड व विसापूरचे आवर्तन २५ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी दिली. विसापूरचे १ फेब्रुवारीपासून तर घोडचे आवर्तन १० फेब्रुवारीपासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
10. शिर्डी नगरपंचायतच्या वतीने नाल्याची सफाई
केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे.शिर्डी शहराचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अव्वल नंबर येणेसाठी नगरपंचायतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातभाई मळा येथील नाल्याची सफाई करण्यात आली.
No comments
Post a Comment