Breaking News

6/breakingnews/random

24 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

     News24सह्याद्री - पुण्यात डी कंपनीने थाटले होते दुकान, NCB ने 3 अड्डे केले उद्ध्वस्त....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा



TOP HEADLINES

1. ट्रम्प यांच्यावरील महाभियोग सुनावणी 8 फेब्रुवारीपासून
प्रक्रियेत ट्रम्प दोषी आढळले तर त्यांना पुढची निवडणूक लढता येणार नाही. अमेरिकन सिनेटचे मेजॉरिटी नेते चक शुमर यांनी ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रक्रियेबाबत प्रसिद्धीमाध्यमांना हि माहिती दिली.  

2. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज

 सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.ग्राम विकास विभाग आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे वयाच्या 50/55 वर्षापलीकडे किंवा अरहता कारी  30 वर्षाच्या सेवेनंतर शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमावण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली आहे. 


3. पुण्यात डी कंपनीने थाटले होते दुकान, NCB ने 3 अड्डे केले उद्ध्वस्त

 एन सी बी  ने काही दिवसांपूर्वी गँगस्टर करीम लालाचा नातू चिंकू पठाणला अटक केली होती. त्याच्याकडे असलेल्या डायरीतून हि  धक्कादायक माहिती समोर आली आहे.


4. "RSS महिलांचा आदर करत नाही" राहुल गांधींची जळजळीत टीका
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी तामीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर टीकेची झोड उठवली. आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना आहे. असा आरोप त्यांनी केला.  


5. लालूप्रसाद यांची प्रकृती गंभीर

लालू यांच्या फुप्फुसात पाणी झाले असून चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली  


6. भाजपकडून शंभर कोटींची ऑफर
आ. शशिकांत शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोरेगाव येथे पत्रकारांशी अनौपचारीक संवाध साधत असताना शशिकांत शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.  

7. जातीनिहाय जनगणना करा-पंकजा मुंढे 
देशाची 16 वी जनगणना 2021 मध्ये होणार आहे.. जनगणनेला एप्रिल किंवा मे महिन्यात सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.  

8. ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीनंतर अजित पवार प्रथमच बारामतीमध्ये  
 विद्या प्रतिष्ठान येथे आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अजित पवार बारामती पहिल्यांदा आले असल्यानं नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी देखील भेटीसाठी गर्दी केली होती  

9. दोन फोटो जे मराठी माणसाला हवेहवेसे वाटणारे

शिवसेना आणि मनसे एकत्र यावेत ही मराठी माणसाची मनापासूनची इच्छा आहे. नजीकच्या काळात हे दोन पक्ष एकत्र येतील अशी प्रत्येक मराठी माणसाला आशा आहे. पण असं असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अधूनमधून एकाच मंचावर पाहून मराठी माणूस सुखावून जातो. काल शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी हे दोन्ही नेते एकत्र आले आणि मराठी माणसाला सुखद दिलासा मिळाला.  

10. मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर फाईलमधला शेराच बदलला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी सही केलेल्या मंत्रालयातील एका महत्त्वाच्या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी केली असता या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर त्याच्यावरती असणाऱ्या मजकुरात कोणीतरी फेरफार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्याचा छडा लावण्यासाठी मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *