शहराची खबरबात - नगरचे नामकरण अंबिकानगर करावे - शशिकांत गाडे
News24सह्याद्री - नगरचे नामकरण अंबिकानगर करावे - शशिकांत गाडे....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. सांस्कृतिक क्षेत्र विकासासाठी तयार होतेय हक्काचे नाट्यगृह
अहमदनगर शहरात महानगरपालिकेचे हक्काचे अद्ययावत असे नाट्यगृह लवकरच तयार होणार आहे असे प्रतिपादन जेष्ठ नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी केले. प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्यगृहाची पाहणी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या समवेत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
2. त्या रुग्णालयांचे रजिस्ट्रेशन रद्द का करू नये - जिल्हाधिकारी भोसले
नोटिसा पाठवूनही त्यांनी रुग्णांना बिले अदा केली नाही तर रुग्णालयांचे रजिस्ट्रेशन रद्द का करू नये अशा प्रकारची नोटीस पाठवली असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले तथापि रुग्णालयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे
3. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर शहरात विविध उपक्रम राबवतात त्यातच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन यांच्यावतीने करण्यात आले होते. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे तसेच युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4. नगरचे नामकरण अंबिकानगर करावे - शशिकांत गाडे
अहमदनगरचे अंबिकानगर करून जुना इतिहास लोकांपर्यंत जावा अशी इच्छा आहे त्या दृष्टीने राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली. याबाबत शशिकांत गाडे यांच्यावतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले
5. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
संघर्षमय जीवनातून त्यांनी समाज घडविण्याचे काम केले होते. आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करता ते आपले काम करत होते. समाजाच्या उन्नतीसाठी अखंड प्रयत्न करत राहिले. आपल्या जीवनामध्ये देखील त्यांनी देशहिताला प्राधान्य दिले असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केले
No comments
Post a Comment