30 जानेवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - मंचरला स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी पळविले....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. मंचरला स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी पळविले;
मंचर शहराच्या भरवस्तीतील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील कॅश डिपॉझिट मशीन चोरट्यांनी शुक्रवारी(दि.२९ ) पहाटे चोरून नेले आहे. यात मशीनमधील 18 लाख 53 हजार 800 रु[यांची रोख रक्कम चोरीला गेली आहे.
2. पालक संघटनेचा थेट शिवसेना भवनावरच मोर्चा, फीचं काय करणार?
विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या मुद्द्यावरुन पालक संघटना आक्रमक झाली आहे. ऑल इंडिया पॅरेंट्स असोसिएशन या पालकांच्या संघटनेने आज थेट शिवसेना भवनवर मोर्चा काढला. पालकांची 40 टक्के फी भरण्याची तयारी आहे.
3. केंद्र सरकारकडून ‘पद्मश्री’ने सन्मानित
सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेने मालमत्ता कराची नोटीस पाठवल्याने राजकीय वादंग निर्माण झाला आहे. मी उपमुख्यमंत्री असलो, तरी जिथे राहतो तिथले टॅक्स भरावे लागतात, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
4. भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एक गाडी बंदुक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे वाघाचे चिन्ह आहे. हा व्हिडीओ एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन शेअर केला होता.
5. ऐकावं ते नवलच.. तहसीलदार कार्यालयातून संगणक गेला चोरी
फलटण तहसीलदार कार्यालयातील संगणक अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेले आहेत. तहसील कार्यालय हे अधिकार गुहांमध्ये आहे या अधिकार गृहामध्ये सर्व शासकीय कार्यालये आहेत. तहसील कार्यालयात मध्यरात्री कोणी नसल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील महत्त्वाच्या नोंदी असलेले संगणक चोरून नेले आहेत.
6. राष्ट्रवादी आमदारांच्या आघाडीला मोठा सुरुंग
बीड विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झाल्यानंतरही बीड शहराचा आणि मतदारसंघाचा विकास केवळ बोलण्या पुरताच राहिलाय. विधानसभेच्या निवडणुकीत ज्या शिलेदारांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना आमदार केले, त्याच शिलेदारांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.
7. शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बोलले
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे.
8. रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द, बीसीसीआयचा मोठा निर्णय
देशांतर्गत सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी करंडक स्पर्धारद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाहयांनी यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
9. सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला आहे.
१०. मराठा आरक्षणप्रश्नी शिवसंग्राम नांदेड, नागपूर, मुंबई बारामतीमध्ये एल्गार मेळावे घेणार-विनायक मेटे
अनेक राजकीय नेते मराठ्यांच्या जीवावर मोठे होतात. संपत्ती कमावून साम्राज्य निर्माण करतात. आणि आता तेच मंत्री मराठ्यांच्या जीवावर उठले आहेत. आपापल्या खात्यात नोकरभरती सुरू करणारे मंत्री हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे यांनी दिली आहे.
No comments
Post a Comment