शहराची खबरबात - महावितरणच्या मोहिमे अंतर्गत 22 कोटींची वसुली
News24सह्याद्री - मंगळसूत्र चोरास अटक करण्यात पोलिसांना यश...पहा शहराची खबरबात मध्ये
1. महावितरणच्या मोहिमे अंतर्गत 22 कोटींची वसुली
थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज जोड तोडणी मोहीम हाती घेताच नगर शहरातून 22 कोटी रुपयांचे थकत वीजबिले जमा झाली आहे. महावितरणच्या नगर शहर विभागांर्तगत नगर शहर, पारनेर व नगर तालुका असा भाग आहे.
2. सावेडीत धुमस्टाईल चोर्या
शहरातील पाईपलाईन रोडवर तीन ठिकाणी धुमस्टाईलने चोर्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यावर कायमच वर्दळ असते. शुक्रवारी दुपारच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी डाव साधला असून सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
3. खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
खुनाच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षापासून फरार आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करण्यात आली होती.
4. तारकपूर बसस्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे नाव देण्याची मागणी
शहरातील तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि मागासवर्गीय, बहुजन, बौद्ध, मातंग, समाजाच्या वतीने करण्यात आली.
No comments
Post a Comment