Breaking News

1/breakingnews/recent

31 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

       News24सह्याद्री - किरीट सोमय्यांच्या मुलाची जुन्या वादातून कसून चौकशी...पहा जिल्ह्याची खबरबात




TOP HEADLINES


1. 1 फेब्रुवारीसाठी रेल्वे प्रशासनाची पूर्वतयारी सुरु
येत्या एक फेब्रुवारीला मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिवस असणार आहे.  त्यादिवशी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन रेल्वेनं पूर्वतयारी सुरु केली आहे. 

2. किरीट सोमय्यांच्या मुलाची जुन्या वादातून कसून चौकशी
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पूत्र नील सोमय्या याची एका जुन्या वादातून पोलीस चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी काहीवेळापूर्वीच नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. 

3. वडोल गावातील निवासी घरांची जागा एमआयडीसीकडून वगळून मिळणार
अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.बालाजी कीणीकर यांच्या प्रयत्नामुळे अंबरनाथ,वडोल गावातील निवासी घरांची जागा नागरीकांना एमआयडीसी कडुन वगळून मिळणार असल्याने स्थानिक नागरीकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.  

4. कल्याण कचोरे गावातील नवीन बीएसयूपी घराची दुरावस्था
कल्याण डोंबिवली मधील प्रकल्प बधितांना लवकर घरे  मिळावी याकरिता लाभार्थी मुख्यालयात येऊन खेटा घालतात. मात्र अनेक वेळा कागदपत्राची पडताळणी आणि सरकारी कामकाजामुले मुख्य लाभार्थीला घरे लवकर मिळत नाहीत 

5. स्मार्ट सिटी अंतर्गत डोंबिवलीत एल.ई.डी स्ट्रीट लाईटचा शुभारंभ 
कल्याण- डोंबिवली स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व प्रभागामधील स्ट्रीट लाईट या एल ई डी करण्याची योजना आखली असून या योजनेचा शुभारंभ डोंबिवलीतील सम्राट अशोक चौक ते ठाकूरवाडी व काळू नगर ते रेतीबंदर चौक या मुख्य रस्त्या पासून केली आहे.

6. ब्राम्हण समाज पुन्हा आक्रमक
कित्येक आदोलने झाली, निवेदन दिली गेली, आश्वासन दिली मात्र ब्राह्मण समाजाच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे ब्राम्हण समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. 

7. 32 वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत चर्चा सत्र संपन्न
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे काल गेलडा  भवन येथे उप प्रादेशिक परिवाहन विभाग बुलढाणा व डॉक्टर केशवराव हेडगेवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रायगांव तालुका लोणार यांच्या वतीने एक दिवसीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

8. अवैध दारूची तस्करी करणारी बोलेरो पोलिसांच्या ताब्यात 
शिरपूर तालुक्यात मध्यप्रदेशातून अवैधरित्या बियर मद्यार्क खरेदी करून महाराष्ट्रमध्ये विकण्याच्या हेतूने घेऊन जाणारी एक महिंद्रा बोलेरो पिकअप शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतली 

9. माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट   
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आदिवासी संघर्ष समितीचे नेते माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे यांनी काल वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. 

10. जय शहा यांना मिळाले आणखी एक पद
BCCI चे सचिव जय शहा यांची अचानक आशिया क्रिकेट परिषद च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण सिंह धूमल यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *