23 जानेवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - राजस्थानात सापडला कुबेराचा खजिना...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. भारत पाकिस्तान सीमेवर आढळला २ रा बोगदा
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरमधील हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे एक बोगदा शोधून काढला. या बोगद्याची लांबी १५० मीटर लांब असून, मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती. दहा दिवसांच्या आत सीमेवर आढळलेला हा दुसरा बोगदा आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहे.
२. अकोल्यात हेल्थ केअर सेंटरमध्ये देहव्यापार
अकोल्यातील उच्चभृ वस्तीत सुरू असलेल्या देह व्यापार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून, एक महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे.अकोला शहरात उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर नगर रोडवरील हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली देह व्यापार चालविला जात आहे. या मिळालेल्या माहितीवरून अकोला पोलिसांच्या विशेष पथकानं या हेल्थ केअर सेंटरवर कारवाई केलीय. या कारवाई दरम्यान डॉ. प्रदीप देशमुख यांच्यासह संतोष सानप, रतन लोखंडे आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आलय.
३. शेतकरी नेत्यांच्या हत्येची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता मिळालंय. शनिवारी रात्री आंदोलनस्थळी एका संशयित आरोपीला पकडलं होतं. त्या आरोपीनं चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याच व्यक्तीचा नवा व्हिडीओ समोर आला असून, शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे माध्यमांशी बोललो, असा यू-टर्न आरोपीनं घेतलाय.
४. राज ठाकरेंच्या भेटीनंतर लाड यांचं खोचक विधान
मुंबई महापालिकेत भाजपा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र त्यानंतर त्यांनी शिवसेनेनला इशारा देणारं विधान केलंय. “शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्य ते सर्व करु,” असं म्हणत लाड यांनी शिवसेनेला आगामी महापालिका निवडणुकीसाठी इशारा दिलाय.
५. राजू शेट्टींवर सदाभाऊ खोतांची टीका
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 25 जानेवारीपासून राज्यात एफआरपीच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. याच मोर्चाला सदाभाऊ खोत यांनी लक्ष्य केलंय. राजू शेट्टी कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आता ते चोरांच्या आळंदीला पोहोचलेत, अशी टीका सदाभाऊंनी केलीय.
६. 'देशाला चार राजधान्या हव्यात' - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज एक वेगळीच मागणी केली आहे. देशाची एकच राजधानी असण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून, देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कोलकातामधील श्याम बाजार येथे एका भव्य रॅलीच्या कार्यक्रमात त्यांनी हे मोठं विधान केलंय .
७. गडचिरोलीमध्ये संविधानाचा विजय
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भाग आणि माओवाद्यांच्या कारवाया होणारा असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं इतिहास घडवलाय. गेल्या 38 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत नक्षलवाद्यांचा हल्ला झाला नाही. गडचिरोलीमध्ये अनेक ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. कोणत्याही अनुचित घटनेशिवाय ग्रामपंचायत निवडणूक पार पडली हा भारतीय संविधानाचा विजय असल्याचं बोललं जातेय.
८. राजस्थानात सापडला कुबेराचा खजिना
राजस्थानात आयकर विभागाने सर्वात मोठा छापा टाकून कुबेराचा खजिनाच शोधून काढला आहे. आयकर विभागाने जयपूरमध्ये सराफा व्यापारी, दोन रियल इस्टेट डेव्हल्परच्या कार्यालय आणि घरी धाडी मारून पावणे दोन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. एका सराफा व्यापाऱ्याच्या घरात तर तळघर सापडले असून त्यात 700 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
९. उत्तर प्रदेशात आता रेल्वे व क्रूझमध्ये मिळणार मद्य
उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मद्य विक्री आणि परवाना प्रक्रिया सुलभ केल्यामुळे आता रेल्वे आणि क्रूझमध्येही मद्य विक्री करणे शक्य होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अबकारी नियमावली २०२० लागू केली असून, यातील तरतुदीनुसार मद्य परवाना प्रक्रिया सुलभ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
१०. परभणीमध्ये प्लेइंग क्युबद्वारे साकारले स्व.बाळासाहेब ठाकरेंचे चिञ
परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनुज नांदगावकर या दहावीतील विध्यार्थ्याने एक हजार प्लेइंग क्युबद्वारे पाच बाय सात फुटामध्ये चिञ साकारलय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रातील हे प्लेइंग क्युबद्वारे एव्हढे मोठे चिञ साकारलेले ही पहिलीच घटना असं बोललं जात आहे. मानवत शिवसेनेचे दिपक बारहाते आणि बालाजी दहे यांनी अनुजला संधी दिलीय.. तसेच शहरातील सुचना फलकाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन देखील करण्यात आलय.
No comments
Post a Comment