Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - कांद्याचा भाव कमी केल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन

No comments

          News24सह्याद्री - कांद्याचा भाव कमी केल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन...पहा जिल्ह्याची खबरबात




TOP HEADLINES

1. नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन  
 छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले तसेच नगरपालिका कार्यालयातहि  अभिवादन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या सह विविध पक्षाचे पदाधिकारी हजर होते. 

2. अकोले तालुक्यातून हजारो शेतकऱ्यांचा व्हेईकल मार्च 
 आज नाशिक च्या दिशेने आगेकूच केली आहे.किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हा व्हिइकल मार्च अगोदर नाशिक येथील गोल्फ मैदानावर जाणार असून  पूढे 25  तारखेला आझाद मैदाना वरून 50 हजार शेतकरी राजभवनावर पोहचणार आहे.

3. बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे बचतगटांना कर्ज वाटप 
बँक ऑफ महाराष्ट्र च्या अकोले शाखेच्या शाखा व्यवस्थापक कविता पंढरे यांनी व्यक्त केलाय. तर  अकोले   तालुक्यातील उंचखडक  येथील अगस्ति स्वयंम सहायता बचत गटाला आज बँक ऑफ महाराष्ट्र ने  एक लखाचे कर्ज मंजूर केले  हा आनंद बचत गटातील प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

4. कांद्याचा भाव कमी केल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन  
 सुमारे दोन तास आंदोलन सुरू होते त्यामुळे  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाथर्डी रोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हे आंदोलन कांदा भाव कमी आसल्यामुळे सुरू झाले.  पोलिसांना तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर हे आंदोलन सोडण्यात यश आलं 

5. नाशिक-पुणे महामार्गावर जीप-टेम्पो अपघातात सहा जखमी
अपघात आज सकाळी आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा फाटा येथे घडला. या अपघातात जीपचालक तसेच इतर ५ जण जखमी झाले असून  जीपचेही  मोठे नुकसान झाले.

6. दोन गटात तुफान वाद, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल आर पी पुंड पुढील तपास करीत आहे.
 
7. माजी नगराध्यक्षाच्या घरावर जेसीबी नेणाऱ्या सहा जणांवर गुन्हा 
 मुलगा गणेश बोरुडेसह चार ते पाच जणांवर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे असून हा वाद राजकीय वैमनस्यातून झाली कि वैयक्तिक याबद्दल उलटसुळ्या चर्चाना उधाण आलाय 

8. रास्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती 
नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले जनतेस वाहतूक नियमांची माहिती करून देणे तसेच रस्ते अपघात कमी करण्यासाठी जनतेमध्ये प्रबोधन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून महामार्ग मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय तुपे यांनी आपल्या सहकार्‍यांसह वाहनचालकांना रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांची माहिती दिली

9. सहा वर्षानंतर पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राला ग्रीन सिग्नल
 उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांनी नगर सोबतच नाशिक येथील उपकेंद्रांना शासन मान्यता देत असल्याचे पत्र काढले असून नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील 84 एकर जागेवर पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याला शासकीय मान्यता मिळाली

10. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार 
नेवासा तालुक्यातील साईनाथ नगर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेळीला आपला जीव गमवावा लागलाय वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे साईनाथ नगर येथे काही दिवसांपूर्वीच दोन शेळ्यांना तसेच एका कुत्र्याला ठार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा काल बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेळी ठार झाली आहे त्यामुळे या परिसरात दहशत पसरली

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *