Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - वाडिया पार्कला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी

No comments

 News24सह्याद्री - वाडिया पार्कला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी....पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES

1. कोरोना योद्ध्यांना बेघर करण्याचा डाव
नगर मधील जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी  कोरोना काळात जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली मात्र याच कर्मचाऱ्यांना बेघर करण्याचा घाट घातला जात आहे. हा आदेश न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी रोखल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देऊन इच्छामरणाची परवानगी मागितली आहे यासंदर्भात शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना इशारा दिला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊन पाठपुरावा करू असे जाधव यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले

2. बाळासाहेब ठाकरे यांनी समाजात परिवर्तन घडवले - सुरेखा कदम
हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत होते त्यांनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करून मानाचे स्थान मिळवून दिले कोणत्याही सत्तेची लालसा न बाळगता गोरगरिबांचे प्रश्न सोडवा हा त्यांचा आदेश होता त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण शिवसेनेशी जोडले गेले महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले असे प्रतिपादन यावेळी माजी महापौर सुरेखा कदम यांनी केल

3. वाडिया पार्कला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी
वाडीया पार्कला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे.  घनकचर्याचे काम परत चालू करावे,  रक्तपेढीचे खासगीकरण करू नये आदी मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. वाडिया पार्क क्रीडा संकुलाला शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा ठराव मंजूर झालेला असुन  त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली

 4. दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद  
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून दिनेश दगडू पाटील यांना कोपरगाव येथे बोलावून घेऊन मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रक्कम मोबाईल आणि सोन्याच्या अंगठ्या असा एकूण दहा लाख 74 हजार रुपये किमतीचा ऐवज लुटल्याची घटना घडली या गुन्ह्यातील दरोडा टाकणाऱ्या आणि मोक्काच्या गुन्ह्यामध्ये मागील दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले

 5. सुरभी हॉस्पिटलच्या  सुसज्ज नवीन इमारतीचा शुभारंभ  
अहमदनगर शहरात अल्पावधीतच नावाजलेलय सुरभी हॉस्पिटलच्या  सुसज्ज अशा नवीन इमारतीचा शुभारंभ खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते रविवारी होणार असून या शुभारंभास नगरकरांनी आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन सुरभी हास्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर राकेश गांधी यांनी केलं आहे 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *